Nana Patekar: एकाच बिल्डिंगमध्ये राहायचो म्हणून घरी बोलवायचे अन् चहा बनवायला सांगून…ममता कुलकर्णीने नाना पाटेंकरांबद्दल सर्वच सांगितले

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे, आता यातच अभिनेत्री ममता कुलकर्णीने एक अनुभव बोलू दाखवला आहे.

Nana Patekar: एकाच बिल्डिंगमध्ये राहायचो म्हणून घरी बोलवायचे अन् चहा बनवायला सांगून...ममता कुलकर्णीने नाना पाटेंकरांबद्दल सर्वच सांगितले
| Updated on: Oct 16, 2026 | 12:10 PM

Nana Patekar On Mamta Kulkarni : नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट केली, तर काहींनी व्हिडिओ करत शोकाकुळ व्यक्त केला. नाना पाटेकर सारखा अष्टपैलू कलाकार गमावणे हा चित्रपटसृष्टीला मोठा धक्का आहे. नाना पाटेकर यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना, अभिनेत्याना, नेते मंडळींना सर्वांनाच धक्का बसला. यातच आता अभिनेत्री ममता कुलकर्णीने एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ममता कुलकर्णीने नाना पाटेकरच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आयएएनएसशी बोलताना ती म्हणाली की, नाना पाटेकर तिला लहान मुलीसारखे वागवत असत. नाना पाटेकर आता आपल्यात नाहीत ही दुःखद बातमी आहे. मी त्यांच्यासोबत ‘क्रांतिवीर’ आणि ‘तिरंगा’ या दोन चित्रपटांमध्ये काम केले आणि मेहुलजी त्या दोन्हींचे निर्माते होते. दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. आम्ही दोघेही लोखंडवाला येथील एकाच इमारतीत राहत होतो. मी अनेकदा सकाळी शूटिंगला जायचे आणि ते त्या वेळी बॅडमिंटन खेळायचे. जेव्हा ते मला पाहायचे, तेव्हा माझे केस ओले आहेत हे पाहून ते माझ्या डोक्यावर हात ठेवायचे. ते म्हणायचे, ‘अगं, तू ओल्या केसांनी जात आहेस, आजारी पडशील. परत जा, केस वाळव आणि मग जा.'”

Loading...

ती म्हणाली, “ते मला लहान मुलीसारखे वागवत असत. ते एक उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांना ‘तिरंगा’ आणि ‘क्रांतिवीर’ या दोन्ही चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले होते. आम्ही एकाच इमारतीत राहत असल्यामुळे, मी अनेकदा त्यांच्या घरी जायची किंवा ते कधीकधी बोलवायचे. मी जेव्हाही जायचे, तेव्हा ते मला विचारायचे की मला काय हवं आहे, आणि मग मी त्यांना सांगायचे की चहा द्या, मग ते मला म्हणायचे, जा आत तिथे चहापत्ती आहे, साखर आहे, दूध आहे तूच बनव आणि मलाही दे. ते एका मोठ्या अभिनेत्यासारखे अजिबात वागले नाहीत. नाना पाटेकर आणि अमरीश पुरी हे असे अभिनेते आहेत ज्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us