मनोज तिवारी नाही मीच रीतीचा बाप.., अभिनेत्याच्या पूर्व पत्नीशी गुपचूप लग्न; गायकाचा धक्कादायक दावा

आता या प्रकरणात एकम बावाचे आरोप आणि रीतीच्या टीमकडून करण्यात आलेली पोस्ट यामुळे वाद आणखी वाढला आहे. पुढे या प्रकरणात राणी तिवारी किंवा रीती स्वतः काय भूमिका मांडतात, याकडे ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

मनोज तिवारी नाही मीच रीतीचा बाप.., अभिनेत्याच्या पूर्व पत्नीशी गुपचूप लग्न; गायकाचा धक्कादायक दावा
एकम बावा, मनोज तिवारी-रीती तिवारी
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 29, 2026 | 1:02 PM

Rhiti Tiwar: ‘बिग बॉस 20’च्या घरात सध्या मनोज तिवारी यांची मुलगी रीती तिवारी चर्चेत आहे. शोमध्ये वैयक्तिक आयुष्याबाबत केलेल्या वक्तव्यांनंतर आता तिच्याबाबत बाहेरूनही अनेक दावे केले जात आहेत. पंजाबी गायक एकम बावा याने सोशल मीडियावर रीती तिवारी आणि तिची आई राणी तिवारी यांच्याबाबत काही गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे, आपण राणी तिवारी यांच्याशी लग्न केल्याचा आणि त्यामुळे रीतीचा ‘दुसरा पिता’ असल्याचा धक्कादायक दावा एकमने केला आहे.

काय म्हणाला एकम बावा?

एकम बावाच्या म्हणण्यानुसार, तो 2020 ते 2025 या काळात राणी आणि रीतीसोबत एकाच फ्लॅटमध्ये राहत होता. त्याने असा दावा केला की, 2020 ते 2022 दरम्यान तो आणि राणी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर 18 फेब्रुवारी 2022 रोजी दोघांनी लग्न केलं. या दाव्यांच्या समर्थनार्थ त्याने सोशल मीडियावर राणी आणि रीतीसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. मात्र, राणी तिवारी यांनी त्यांच्या कथित लग्नाला सार्वजनिकरित्या दुजोरा दिलेला नाही.

Loading...

‘बिग बॉस 20’मध्ये रीतीने वडील मनोज तिवारी यांच्याकडून दर महिन्याला अंदाजे 20 ते 25 हजार रुपये खर्चासाठी मिळत असल्याचं सांगितलं होतं. तिने तिच्या बालपणाबद्दल आणि आर्थिक परिस्थितीबद्दलही काही अनुभव शेअर केले होते. यावर एकम बावाने प्रश्न उपस्थित केला. रीतीकडे लाखो रुपयांचे हँडबॅग आणि महागड्या गाड्या असल्याचा दावा करत त्याने 25 हजार रुपयांच्या मासिक भत्त्याच्या वक्तव्यावर सवाल केला. रेंज रोव्हरसारख्या गाडीच्या देखभालीचा खर्चच मोठा असल्याचं तो म्हणाले. तसंच रीती एका मोठ्या टर्नओव्हरच्या स्पोर्ट्स कंपनीशी संबंधित असल्याचा आणि मुंबईत महागड्या फ्लॅट्स असल्याचा दावाही त्याने केला.

पहा व्हिडीओ-

एकमने ‘बिग बॉस 20’मधील रीतीच्या वागण्यावरही नाराजी व्यक्त केली. विशेषतः काजी तौकीर आणि उदिती सिंह यांच्यासोबत झालेल्या वादांदरम्यान रीतीने केलेल्या वक्तव्यांवर त्याने टीका केली. तिचं वागणं पाहून मलाच लाज वाटतेय, असं तो म्हणाला.

रीतीच्या टीमची पोस्ट-

रीतीच्या टीमकडून स्पष्टीकरण

दरम्यान, एकमच्या आरोपांवर रीती तिवारीच्या टीमने प्रतिक्रिया दिली आहे. रीती सध्या ‘बिग बॉस 20’च्या घरात असल्यामुळे स्वतः या आरोपांना उत्तर देऊ शकत नसल्याचं टीमने म्हटलं. एकमने केलेले आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचा दावा करत माध्यमांनी कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी तथ्य तपासावीत, अशी विनंती टीमने केली आहे. या प्रकरणात एकम बावाविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू केल्याचंही टीमने जाहीर केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us