‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दादरमध्ये सुरू केलं हॉटेल; ‘पिठी भात’चा मेन्यू तर पहा..

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता समीर खांडेकरने दादरमध्ये त्याचा नवीन हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. 'पिठी भात' असं त्याच्या या हॉटेलचं नाव असून नुकताच त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अनेक मराठी कलाकार उपस्थित होते.

| Updated on: Jun 08, 2026 | 2:42 PM
1 / 5
'काहे दिया परदेस' या मालिकेतून आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात घराघरात पोहोचलेला अभिनेता समीर खांडकेर याने मुंबईतील दादर परिसरात नवीन मालवणी हॉटेल सुरू केलं आहे. 'पिठी भात' असं या हॉटेलचं नाव असून नुकताच त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये व्हेज मालवणी जेवणाची चव चाखायला मिळणार आहे.

2 / 5

समीरच्या हॉटेलच्या मेन्यूमध्ये रस शेरवाळे, शिरा, घावणे, पोहे, मालपुआ, वांगी-सुरण आणि बटाट्याची कापं, पिठी भात, सार भात, वाटणाची डाळ आणि मात, मालवणी वडे आणि काळा वाटाण्याची उसळ यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या हॉटेलचं इंटेरिअरसुद्धा अत्यंत सुंदर आहे.

3 / 5

समीरच्या या हॉटेलच्या उद्घाटनाला अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकारसुद्धा समीरला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, भक्ती देसाई, नंदिता पाटकर यांनी हॉटेलला भेट दिली आहे.

4 / 5

समीरचं 'पिठी भात' हे हॉटेल दादर पश्चिम इथल्या गोखले रोडवर कॉर्नर व्ह्यू बिल्डिंग याठिकाणी आहे. 'दादर मेट्रो स्टेशन'चं A3 एक्झिटजवळच हे हॉटेल आहे. सोशल मीडियावर या हॉटेलचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

5 / 5

6 जून 2026 पासून हे हॉटेल ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू झालं आहे. याआधी इतरही अनेक मराठी कलाकार वेगवेगळ्या व्यवसायात उतरले आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडेचंही दादरमध्ये हॉटेल आहे. तर काहींचा स्वत:चा कपड्यांचा आणि दागिन्यांचा व्यवसाय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us