गिरिजा ओक हिचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, एका आलू सैंडविच मी कित्येक तास..

गिरिजा ओक हे सध्या तूफान चर्चेत असलेले नाव आहे. गिरिजा ओकची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नुकताच गिरिजा ओक हिने अत्यंत मोठा खुलासा केला, ज्याने तूफान चर्चा रंगताना दिसत आहे.

गिरिजा ओक हिचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, एका आलू सैंडविच मी कित्येक तास..
Girija Oak
| Updated on: Jan 13, 2026 | 12:01 PM

मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या तूफान चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. गिरिजा ओकची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. फक्त गिरिजा ओक हिचा अभिनयच नाही तर तिचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिले आहे. गिरिजा ओक हिने तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दलही काही दिवसांपूर्वी खुलासा केला. दुसऱ्या वडिलांसोबत आणि सावत्र बहीण भावांबद्दल नाते नेमके कसे आहे हे सांगताना गिरिजा ओक दिसली. अतिशय सिंपल लूकमधील गिरिजावर अनेकजण फिदा झाले आहेत. गिरिजा नॅशनल क्रश ठरली. एका मुलाखतीमध्ये गिरिजा ओक हिने तिच्या आईला तिच्या दुसऱ्या लग्नासाठी कसे राजी केले हे सांगितले. फक्त हेच नाही तर आईच्या लग्नानंतर आपली अवस्था नेमकी कशी होती हे देखील तिने सांगितलेे.

सध्या गिरिजा ओक हिची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली. या मुलाखतीमध्ये आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल बोलताना गिरिजा ओक दिसली. हेच नाही तर आयुष्यातील पहिल्या प्रेमाबद्दलही तिने खुलासा केला. गिरिजा ओक कायमच बिनधास्तपणे बोलते. काही दिवसांपूर्वीच गिरिजा ओक हिने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये ती अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसली.

गिरिजा ओक हिने मुलाखतीमध्ये म्हटले की, मी एका आलू सैंडविचसाठी कितीतरी काम करण्यास तयार होते. मी कोणतेही बॅक स्टेजचेही काम करण्यास तयार होते. मी आलू सैंडविचसाठी काहीही करण्यास तयार होते. या मुलाखतीमध्ये गिरिजा ओक खाण्याबद्दल बोलताना दिसली. गिरिजा ओक हिने म्हटले की, वांग्याचे भरीत कोण ब्रेडसोबत खाते?

काही लोक वांग्याची भरीत ब्रेड किंवा पावसोबत खात असल्याचे गिरिजा ओक हिने तिच्या मुलाखतीमध्ये सांगितले. गिरिजा ओक हिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे. पहिल्यादाच गिरिजा ओक ही आलू  सैंडविचबद्दल बोलताना दिसली आणि तिला किती जास्त आलू  सैंडविच आवडते हे तिने सांगितले असून एका आलू सैंडविचसाठी ती काय काय करण्यास तयार होती हे देखील तिने आपल्या या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.