‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेत Eggs Freeze, म्हणाली, ‘आई होणं माझ्यासाठी…’

Actress Life | वयाच्या ३८ व्या वर्षी 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेत Eggs Freeze, आई होण्याच्या निर्णयावर अभिनेत्रीचं मोठं वक्कव्य... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा. कुटुंब आणि करियरबद्दल देखील अभिनेत्रीने केलं मोठं वक्तव्य

या मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेत Eggs Freeze, म्हणाली, आई होणं माझ्यासाठी...
| Updated on: Oct 09, 2023 | 11:07 AM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आई होण्याचा निर्णय घेतला. पण ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने मात्र Eggs Freeze केले आहे. खुद्द अभिनेत्रीने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्या अभिनेत्रीने वयाच्या ३८ व्या वर्षी Eggs Freeze करण्याचा निर्णय घेतला आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नेहा पेंडसे आहे. सध्या सर्वत्र नेहा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. कुटुंब आणि करियरबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे,

नेहा पेंडसे हिने वैवाहिक आयुष्याबद्दल आणि लग्नानंतर झालेल्या बदलाविषयी वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नाच्या दोन वर्षांनंतर आई व्हावं असं मला वाटत होतं. पण मला माझ्या आयु्ष्यात आई कधीच व्हायचं नव्हतं. आयुष्याच्या एका वळणावर आहोत म्हणून असे विचार येत असतील असं मला वारंवार वाटलं.’

‘काही दिवसांनंतर आई होण्याचा विचार निघून जाईल असं देखील मला वाटलं. पण असं झालंच नाही.. दिवसागणिक आई होण्याची इच्छा वाढत होती. पण एका बाळाची जबाबदारी घेणं फार कठीण आहे. जवळपास ८ महिने विचार केल्यानंतर मी मोठा निर्णय घेतला आणि Eggs Freeze केले. मला आई व्हायचं आहे, पण आता नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला कोणावरही अवलंबून राहायचं नाही. पण बाळ झाल्यानंतर मला सतत कोणावर तरी अवलंबून राहावं लागेल. कदाचित मला आर्थिकदृष्ट्या देखील कोणावर अवलंबून राहावं लागेल. याठिकाणी मला स्वतःला सुपरवुमन म्हणायचं नाही. पण मी आयुष्यभर काम करेल आणि पैसे कमावेल..घर सांभाळणं आणि काम करणं या दोन्हीसाठी लागणारी ताकद माझ्यात नाही.’ सध्या सर्वत्र नेहा पेंडसे हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक सिनेमे  आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. 1996 मधील ‘हसरतें’ या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. आज अभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us