Mahesh Manjrekar : गंभीर आजारावर महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य, रुग्णालयात असताना कशी होती परिस्थिती?
Mahesh Manjrekar : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार महेश मांजरेकर कायम त्यांच्या एकापेक्षाएक सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता ते त्यांना झालेल्या गंभीर आजारावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. कॅन्सरवर मात करत असताना रुग्णालयात कशी परिस्थिती होती याबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Mahesh Manjrekar : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार महेश मांजरेकर सध्या त्यांच्या ‘बंडखोर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. जेव्हा एखादी स्त्री बंड करण्याचा निर्णय घेते, तेव्हा कशी परिस्थिती निर्माण होते, हेच सांगण्याचा प्रयत्न महेश मांजरेकर यांनी सिनेमातून केला आहे. सध्या महेश मांजरेकर आणि सिनेमाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मांजरेकर यांनी ‘बंडखोर’ शब्द आणि त्यांच्या कॅन्सरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त महेश मांजरेकर यांची चर्चा रंगली आहे.
बंडखोर शब्द आणि आजारावर विचारलं असता, महेश मांजरेकर म्हणाले, ”बंडखोर’ हा शब्द मी कधीच नकारात्मकरित्या वापरत नाही. मी कधीच कोणत्या गोष्टीला घाबरलेलो नाही. मला कॅन्सर झालेला मला अजूनही आठवतंय मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि आमचा फूल टाईमपास सुरु होता. तेव्हा तो डॉक्टर आला आणि मेधाला म्हणाला, ‘याला माहिती आहे का याला काय झालं आहे?’
‘तेव्हा मी त्या डॉक्टरला विचारलं याठिकाणी मी काय केलं पाहिजे, मी रडत बसायला पाहिजे. आम्हाला काही वाटत नव्हतं.’ पत्नी मेधा यांच्या कॅन्सरबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले, ‘मेधाने मला सहन केलं आहे तर, तिच्यासाठी कॅन्सर काय आहे. मेधा अशी दिसते खूप नाजूक पण ती खूर स्ट्रॉन्ग आहे. तिने देखील त्या परिस्थितीचा सामना केलाय आणि त्यातून बाहेर पडली आहे. अशा परिस्थितीत ती खचून जाणाऱ्यातली नाही.’
पुढे मांजरेकर म्हणाले, माझ्या कॅन्सर वेळी काय झालं, मी कायम एकच म्हणतो पुरुष घाबरतो, या आजारात, जेव्हा स्टेन टाकली तेव्हा ती कायम माझ्यासोबत होती. मी त्याच्या 50 टक्के वेळ देखील तिला देत नाही. कारण पुरुष घाबरतो, बाई घाबरत नाही…’, असं देखील महेश मांजरेकर मुलाखतीत म्हणाले आहेत.
‘बंडखोर’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, अनेकांना ट्रेलर आवडला आहे. आता चाहते सिनेमा कधी मोठ्या पडद्याावर प्रदर्शित होतो याच प्रतिक्षेत आहे. सिनेमात महेश मांजरेकर यांच्यासोबत अभिनेत्री छाया कदम, मृणाल कुलकर्णी, प्रियदर्शिनी इंदलकर, पूजी कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि अभिनेता संकेत पाठक यांनी महत्त्वाची भूमिका साकरली आहे. सिनेमा 24 सप्टेंबर 2026 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.