Daler Mehndi: 35 लाख रुपये दिले होते..; दलेर मेहंदी यांना मंचावरच मंत्र्यांनी फटकारलं, आता केला मोठा दावा

Daler Mehndi: दलेर मेहंदी हे मद्यपान करून स्टेजवर परफॉर्म करत होते, असा आरोप उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी केला आहे. भर कार्यक्रमात त्यांनी दलेर यांना रोखलं होतं.

Daler Mehndi: 35 लाख रुपये दिले होते..; दलेर मेहंदी यांना मंचावरच मंत्र्यांनी फटकारलं, आता केला मोठा  दावा
दलेर मेहंदी
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2026 | 3:09 PM

Daler Mehndi: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी सध्या त्यांच्या गाण्यांमुळे नव्हे, तर एका कार्यक्रमातील वादामुळे चर्चेत आले आहेत. उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी दलेर मेहंदी यांच्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त करत त्यांना थेट मंचावरच जाब विचारला. आता या वादाला आणखी एक महत्त्वाचं वळण मिळालं आहे. दलेर मेहंदी यांना कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी तब्बल 35 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा मंत्र्यांनी केला आहे. एवढी मोठी रक्कम देऊनही गायकाने अपेक्षेप्रमाणे सादरीकरण केलं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मनोरंजनविश्वात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकं काय घडलं कार्यक्रमात?

ही घटना उत्तराखंडमधील नवी टिहरी इथं आयोजित सिद्धपीठ माँ कुंजापुरी पर्यटन आणि विकास मेळ्यात घडली. या कार्यक्रमात दलेर मेहंदी सादरीकरण करत होते. त्यावेळी उपस्थित असलेले मंत्री सुबोध उनियाल अचानक मंचावर गेले आणि त्यांनी गायकाच्या सादरीकरणावर आक्षेप घेतला. मंत्र्यांच्या आरोपानुसार, दलेर मेहंदी व्यवस्थित गात नव्हते आणि प्रत्यक्ष गाण्याऐवजी आधीच रेकॉर्ड केलेल्या गाण्यांवर केवळ ओठांची हालचाल (लिप सिंक) करत होते. याशिवाय, ते मंचावर अस्वस्थ किंवा गोंधळलेल्या अवस्थेत दिसत असल्याचंही उनियाल यांनी म्हटलं. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमादरम्यानच नाराजी व्यक्त केली.

Loading...

पहा व्हिडीओ-

या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सुबोध उनियाल यांनी दलेर मेहंदी यांच्या मानधनाचा उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गायकाला कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी 35 लाख रुपये देण्यात आले होते. एवढं मोठं मानधन घेणाऱ्या कलाकाराने आपल्या कलेला न्याय द्यायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. दलेर मेहंदी हे लोकप्रिय आणि अनुभवी गायक आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्ष सादरीकरणात अपेक्षित उत्साह आणि गायन दिसलं नाही, असा आरोप मंत्र्यांनी केला. नवरात्रीच्या धार्मिक वातावरणात कार्यक्रमाची प्रतिष्ठा आणि शिस्त राखण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मंचावर मंत्री आणि गायक यांच्यात झालेल्या या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us