Nana Patekar : महिलांसोबत गैरवर्तन नानांसाठी फार मोठी गोष्ट नाही, ते तर एक मुलगा, दिग्दर्शकाला सुद्धा…, अभिनेत्रीच्या गंभीर आरोपांनी उडालेली खळबळ
Nana Patekar : अभिनेता नाना पाटेकर आज जगात नाहीत. पण त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टींची चर्चा आता रंगली आहे. नाना पाटेकर यांच्यावर फक्त तनुश्री दत्ता हिनेच केलेले आरोप नाहीत तर, अन्य आरोप देखील आहे. एका नाना पाटेकर यांनी विमानतळावर एका मुलाला मारलं होतं... तेव्हा नेमकं काय घडलं होतं जाणून घ्या...

Nana Patekar : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेत नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या आरोपांनंतर नाना वादाच्या भोवऱ्यात अडकले. पण फक्त तनुश्रीच नाही तर, एका मुलाला देखील नाना पाटेकर यांनी विमानतळावर मारलं होतं. पण त्यानंतर माफी मागत नाना पाटेकर यांनी, तो शुटिंगचा भाग असल्याचं सांगितलं होतं. यावर अभिनेत्री तनुश्री हिने तेव्हा देखील नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पाटेकर जर मुलाला मारु शकतात, दिग्दर्शकाला मारु शकतात, तर महिलांसोबत गैरवर्तन नानांसाठी फार मोठी गोष्ट नाही.. असं तनुश्री म्हणाली.
सध्या तनुश्री,नाना पाटेकर यांच्याबद्दल धक्कादायक दावे करताना दिसत आहे. यापूर्वी देखील अभिनेत्रीने असं केलं. विमानतळावर नानांनी मुलाला मारल्याच्या प्रकरणावर तनुश्री म्हणालेली, ‘जेव्हा वाराणसी याठिकाणी एका मुलाला मारल्याचा नानांचा व्हिडीओ समोर आला. तेव्हा देखील ते खोटं बोलताना दिसले. नाना किती खोटे आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. तेव्हा अनिल शर्मा यांच्या सिनेमाचं शुटिंग नाना करत होते. नाना यांनी आधी मुलाला मारलं आणि त्यानंतर सिनेमाची शुटिंगचा सीन असल्याचं सांगत स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागू लागले…’ असं तनुश्री म्हणाली.
नाना पाटेकर खोटं बोलण्यामध्ये फार हुशार – तनुश्री दत्ता
तनुश्री दत्ता असं म्हणाली की, ‘आता नाना पाटेकर पुर्णपणे घाबरले आहेत. कारण त्यांना इंडस्ट्रीमधून बाजूला केलं आहे. लोकांना आता दिसत आहे की, नाना कसे लोकांचे विचार बदलतात. नाना पाटेकर खोटं बोलण्यामध्ये फार हुशार आहेत. फक्त मी नाही, अनेकांनी सांगितलं आहे नाना पाटेकर चांगला माणूस नाही. वाराणसीच्या त्या मुलाने देखील सत्य सांगितलं होतं.’
पुढे तनुश्री म्हणाली, ‘नाना जर सर्वांसमोर मुलाला मारू शकतात, दिग्दर्शकाला मारहाण करु शकतात, तर एखाद्या महिलेसोबत गैरव्यवहार करणं त्यासाठी कोणती मोठी गोष्ट नाही… ‘, सध्या तनुश्री हिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तनुश्री, नाना यांच्या विरोधात धक्कादायक दावे करताना दिसत आहे.