Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णी यांच्या प्रेग्नेंसीमध्ये काय घडलेलं? त्याची आजही खंत, अनेक वर्षांनंतर सांगितला खासगी किस्सा

Mrinal Kulkarni : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्याती एक खासगी किस्सा सांगितला. जेव्हा त्या प्रेंग्नेट होत्या आणि डोहाळे जेवणा दरम्यान झालेल्या एका गोष्टीची खंत आजही त्यांच्या मनात आहे...

Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णी यांच्या प्रेग्नेंसीमध्ये काय घडलेलं? त्याची आजही खंत, अनेक वर्षांनंतर सांगितला खासगी किस्सा
Mrinal Kulkarni
| Updated on: Sep 23, 2026 | 8:59 AM

Mrinal Kulkarni : प्रेग्नेंसी, मातृत्व… या गोष्टी एका महिलेच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी महिलांच्या कायम लक्षात राहतात. पण या काळात अशी परिस्थिती देखील निर्माण होते, जेव्हा महिला काहीच बोलू शकत नाही किंवा याठिकाणी बोलायला हवं… हे कळत नाही आणि जेव्हा कळतं, तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते. पण त्याची खंत मनात कायम राहते. असंच काही अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत देखील झालं आहे. जेव्हा त्यांना बोलता आलं नाही. तो किस्सा अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर सांगितला आहे.

स्वतःचा एक अत्यंत खासगी किस्सा सांगत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘मला अजून खंत आहे… तेव्हा जे घडलं त्याला बंड म्हणता येणार नाही. बंड हा फार मोठा शब्द झाला. पण तेव्हा मी जे घडतंय त्याचा विरोध करायला हवा होता. मी प्रेग्नेंट होते आणि डोहाळे जेवण होतं. कर्म धर्म संयोगाने माझ्या आईच्या दोन अत्यंत जवळच्या मैत्रीणी आणि माझ्यासाठी एकदम सख्ख्या आलेल्या,  त्यांना मुल नाही… आणि डोहाळे जेवणाच्या वेळी अशी एक टूम निघाली, त्यांच्याकडून ओटी भरुन घ्यायची नाही.

पुढे मृणार कुलकर्णी म्हणाल्या,  ‘तेव्हा मी सुद्धा खूप लहान होते आणि ते माझ्या लक्षात आलं नाही.  त्या दोघींना ओटी भरु दिली नाही. ती खंत माझ्या मनात आज पर्यंत आहे, की असं कसं झालं आणि तेव्हा मी विरोध का केला नाही किंवा करु शकले नाही… विरोध करायला पाहिजे.. असं माझ्या मनातही नव्हतं आणि मला तेव्हा खटकलं देखील नाही. जर मला ते खटकलं असतं, तर मी नक्कीच माझ्या पद्धतीने बंड केलं असतं…’

‘माझ्या पद्धतीचं बंड थोडं वेगळ आहे. शांतपणे मी बंड केलं असते. पण तरीसुद्धा जी खटकलेली गोष्ट आहे, ती लक्षात देखील आली पाहिजे आणि तात्काळ त्यावर निर्णय घेतला पाहिजे. माझं असं म्हणणं नाही की, भांडणच केलं पाहिजे, पण त्यावर निर्णय घेता आला पाहिजे… ‘असं देखील मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.

सांगायचं झालं तर, मृणाल कुलकर्णी लवकरच ‘बंडखोर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान, त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील खासगी किस्सा सांगितला आहे.

 

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us