MS Dhoni : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलेलं धोनीचं नाव; एक अभिनेत्री म्हणालेली, माझ्या आयुष्याला लागलेला डाग…

MS Dhoni Affairs : एम. एस. धोनीचं नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलेलं.

| Updated on: Nov 17, 2026 | 9:25 PM
1 / 6
एम.एस. धोनीनं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनी सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अशातच आता त्याच्या अफेअर्सचीही चर्चा होतेय.  आज धोनी पत्नी साक्षीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत असला तरी, एकेकाळी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.

एम.एस. धोनीनं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनी सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अशातच आता त्याच्या अफेअर्सचीही चर्चा होतेय. आज धोनी पत्नी साक्षीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत असला तरी, एकेकाळी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.

2 / 6

दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी आणि धोनी यांच्यातील अफेअरच्या अफवांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. धोनीनं या नात्याला कधीही दुजोरा दिला नाही. मात्र, २०१४ मध्ये राय लक्ष्मीनं धोनीसोबत अफेअर असल्याची कबुली दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांनी २००९ मध्ये डेटिंगला सुरुवात केली होती.

3 / 6

पण हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यांच्या ब्रेकअपनंतरही, या अभिनेत्रीचं नाव धोनीसोबत जोडलं गेलं आणि तिला सतत त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जात होते. यामुळे वैतागून राय लक्ष्मी एका मुलाखतीत संतापली होती. या नात्याचा तिच्यावर इतका परिणाम झाला होता की, तिनं या नात्याला 'माझ्या आयुष्याला लागलेला डाग' असंही म्हटलं होतं.

4 / 6

राय लक्ष्मी म्हणालेली की, 'लोकांच्या प्रश्नांनंतर मला असं वाटू लागलं की, धोनीसोबतचं माझं नातं एका डागासारखं आहे, तो डाग माझ्यासोबत खूप काळ राहिला. जेव्हा जेव्हा धोनीच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल चर्चा व्हायची, तेव्हा माझाही उल्लेख व्हायचा.'

5 / 6

धोनीचं नाव दीपिका पादुकोणसोबतही जोडलं गेलं होतं. अनेकदा ते एकत्र दिसले होते. एका सामन्यादरम्यान धोनीला प्रोत्साहन देण्यासाठी दीपिका आली होती. असं म्हटलं जातं की, दीपिकाच्या सांगण्यावरून धोनीनं आपले लांब केस कापले होते. पण काही काळानंतर हे नातंही तुटलं.

6 / 6

धोनीचं नाव अभिनेत्री असिनसोबतही जोडलं गेलं होतं. त्या दोघांनी एकत्र एका जाहिरातीचं शूटिंग केलं होतं आणि त्या काळात ते एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र, तिनं या नात्याला कधीही दुजोरा दिला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us