एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या बायोपिकसाठी या अभिनेत्रीला 7 वेळा ऑफर, तरी का रखडला चित्रपट?

कधी साऊथ इंडस्ट्रीत नाकारलेली गेलेली अभिनेत्री विद्या बालनने जेलर 2 द्वारे व्हर्सेटाइल अभिनयाचा दाखला दिला. नुकतंच तिने तिच्या ड्रीम प्रोजेक्टबद्द सांगितलं, जो आता रश्मिका मंदानाच्या पारड्यात पडला आहे.

एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या बायोपिकसाठी या अभिनेत्रीला 7 वेळा ऑफर, तरी का रखडला चित्रपट?
| Updated on: Oct 17, 2026 | 3:06 PM

MS Subbulakshmi Biopic Movie : भारताच्या कानाकोपऱ्यात असे एकाहून एक सरस कलाकार आहेत, ज्यांचं गायन लोकांना प्रचंड आवडतं. पण देशात सर्वात प्रथ्म भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या कलाकार म्हणजे एम एस सुब्बुलक्ष्मी. त्यांना साक्षात सरस्वतीचा आवाज म्हटलं जातं. मोठ-मोठ्या मंडिरातील सकाळ त्यांच्याच सुमधुर आवाजाने होते. जगभरात नाव कमावणाऱ्या आणि साउथ इंडस्ट्रीमध्ये आपल्या आवाजाच्या जादून सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या एम एस सुब्बुलक्ष्मी यांचं भारतीय संगीतातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याबद्दल बरीच चर्चा झाली. जेलर 2 मध्ये व्हिलनची भूमिका साकारणारी, चतुरस्त्र अभिनेत्री विद्या बालन हिला तर या फिल्मसाठी तब्बल 7 ऑफर्स मिळाल्या होत्या. तिनेच हाँ खुलासा केला.

मात्र, काही कारणांमुळे या चित्रपटाचं काम पुढे सरकू शकलं नाही. आता ही बायोपिक अधिकृतपणे निश्चित झाली असून, अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत विद्या बालनने या बायोपिकला आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हटलं. तसेच, या भूमिकेसाठी होकार देऊनही ती ही भूमिका का साकारू शकली नाही, याचाही खुलासा केला.

Loading...

विद्या बालनला 7 वेळा मिळाली होती ऑफर

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत विद्या बालनने सांगितलं की, 2012-13 साली ती दिग्दर्शक राजीव मेनन यांच्यासोबत एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या बायोपिकवर काम करत होती. मात्र, या चित्रपटाविरोधात न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश आल्याने हा चित्रपट बनू शकला नाही. यामुळे विद्या बालनचं मन दुखावलं होतं, कारण हा तिचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि या भूमिकेसाठी ती खूप उत्सुक होती. दिग्गज गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना आदरांजली वाहण्यासाठी विद्याने सोशल मीडियावर काही फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती या ज्येष्ठ गायिकेच्या वेशभूषेत दिसली होती. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. तसेच, चाहत्यांनीही विद्याने ही बायोपिक करावी, अशी मागणी केली होती.

याबाबत विद्या बालनने सांगितलं, “ जेव्हा माझं फोटोशूट व्हायरल झालं, तेव्हा मला एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांची भूमिका साकारण्यासाठी सात चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्रहा चित्रपट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळाल्याशिवाय मी त्याचं काम सुरू करू शकत नाही, असं मी स्पष्ट केलं होतं. एकदा परवानगी मिळाली, तर मी ही भूमिका नक्की साकारेन. पण जर परवानगी मिळाली नाही, तर मी ही भूमिका कधीच साकारू शकणार नाही.” असं तिने नमूद केलं.

आता रश्मिका मंदाना साकारणार भूमिका

विद्या बालनशिवाय, साई पल्लवी देखील ही भूमिका करेल अशी चर्चा होती. मात्र आता या महान गायिकेची भूमिका, रश्मिका मंदाना ही मोठ्या पडद्यावर साकारणार असल्याचे फायनल झालं आहे. विद्या बालन नुकतीच जेलर 2 मध्ये कांताच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटातील तिच्या कामाची खूप चर्चा झाली. चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us