टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश, थेट आरोपींनी..

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. तात्काळ टायगर श्रॉफ याच्या भेटीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. या गोळीबाराचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालीत.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश, थेट आरोपींनी..
Tiger Shroff Mumbai
| Updated on: Oct 19, 2026 | 7:30 AM

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला आहे. अगदी थोडक्यात टायगर श्रॉफ वाचला आहे. अभिनेत्याचा कारचालक जखमी झाला. ड्रायव्हरला गोळी लागल्याचे लक्षात येताच टायगर श्रॉफ याने गाडीचे स्टेरिंग आपल्या हातात घेतले. ही घटना अशा ठिकाणी घडली, जिथे लोकांची प्रचंड गर्दी होती. गर्दीमध्येच टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाला. या घटनेचे अनेक व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गोळीबारात एक रिक्षाचालकही जखमी झाल्याची माहिती मिळतंय. बाईकवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला असून या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. या हल्ल्यामुळे बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण बघायला मिळत आहे. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर करण्यात आली. हल्ल्यानंतर टायगर श्रॉफने आपल्या गाडीचा दरवाजाही उघडला होता.

पोलिसांनी टायगर श्रॉफ याच्यावरील हल्ल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. यासोबतच आरोपींना पकडण्यासाठी काही पथकेही तयार करण्यात आली. यादरम्यानच मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बघायला मिळत आहे. टायगर श्राॅफवर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी अंधेरी स्टेशन गाठले, त्यानंतर तिथून त्यांनी पळ काढला. तिघांनी तिथे हल्यात वापरलेली दुचाकी सोडून पळ काढल्याचे तपासात समोर आले.

Loading...

पोलिसांनी अंधेरी स्थानकावरून हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे. हल्ल्यात वापरलेली दुचाकी प्रथमदर्शनी मुंबईचीच असल्याचे समोर आले. दुचाकीची नंबरप्लेट आणि तेली नंबरवरून दुचाकीला पूर्व इतिहास तपासला जात आहे. तसेच आरोपींची सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस शोध घेत आहे. आरोपी अंधेरी स्टेशनहून नक्की कुठे गेले याचा तपास केला जात आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, ही दुचाकी तिसऱ्यांना विकण्यात आली होती. मुळ मालकाने ही दुचाकी एका दुसऱ्या व्यक्तीला विकली होती आणि त्याने पुन्हा ही दुचाकी विकली. सध्या मुंबई पोलिसांकडून या दुचाकीचा मुळ मालक असलेल्या व्यक्तीची चाैकशी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र, या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us