अश्लील व्हिडीओ, 1 कोटी रुपये अन्…, शेवटच्या पत्रात प्रसिद्ध दिग्दर्शकावर गंभीर आरोप, अभिनेत्री घरी परतलीच नाही, घडलं तरी काय?
ज्यूनियर अभिनेत्रीसोबत प्रसिद्ध दिग्दर्शकाने असं काही केले, ज्यामुळे तिने टोकाचा निर्णय घेतला आणि घराबाहेर पडलेली अभिनेत्री पुन्हा घरी परतलीच नाही... तिने शेवटचं पत्र लिहित दिग्दर्शकांवर गंभीर आरोप केले आहेत.

इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. आता देखील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव मोठं करण्याची इच्छा असलेली नलिनी नामजोशी गुरुवारी घरातून बाहेर तर पडली, पण घरी परत आलीच नाही. तिचा मृतहेदच घरी आला. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, नलिनी नामजोशी हिच्यासोबत नेमकं झालं तरी काय. समोर येत असलेल्या माहितीनुसार, नलिनी नामजोशी हिने दिग्दर्शकाच्या जाचाला कंटाळून स्वतःला संपवलं आहे. दिग्दर्शक सतत नलिनी हिला इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं लालच देत तिचं शारीरिक शोषण करायचा… असे आरोप दिग्दर्शकावर आहेत.
अर्नाळा कोस्टल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या माहितीनुसार, नलिनी नामजोशी या विरार पश्चिममधील जे.पी. नगर भागात राहत होत्या. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास, अर्नाळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकावर बसून त्यांनी कीटकनाशक प्राशन केले.
त्यानंतर पोलिसांनी नलिनी हिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशीर झालेला. नलिनी हिला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. नलिनी हिचा भाऊ याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कथित आरोपी सौरभ पत्की याने इंडस्ट्री आणि वेब सीरिजमध्ये काम देण्याचं नलिनी हिला वचन दिलं होतं. याच कारणामुळे दोघांची जवळीक वाढू लागली.
आरोप आहे की आरोपीने महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केलं आणि सुमारे एक कोटी रुपये देखली उकळले. पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी देखील सापडली. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या कथित पत्रामध्येही आरोपीवर एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.
त्याचप्रमाणे, सतत होणारी ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळामुळे त्रस्त होऊन महिलेने स्वतःला संपवलं , असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी सध्या फरार असून अर्नाळा सागरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी खंडणी आणि इतर गंभीर गुन्हे दिग्दर्शकावर दाखल केले आहेत.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, पत्रात ‘पत्की’ नावाच्या व्यक्तीवर आरोप करण्यात आले आहेत. सध्या पोलीस महिलेच्या भावाचा जबाब आणि त्या नोटचीही चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा मोबाईल फोन बंद आहे आणि सतत त्याचा शोध घेतला जात आहे.