Nana Patekar : ‘येताना धर्म घेऊन आलात का…’, हिंदू – मुस्लिम वादावर नाना पाटेकरांनी सर्वांची बोलती बंद केली तेव्हा…

Nana Patekar : एका शाळेत बोलताना नाना पाटेकर यांनी हिंदू - मुस्लिम वादावर मोठं वक्तव्य केलं होतं. एवढंच नाही तर, कागतपत्रांवर असणाऱ्या धर्म आणि जातीच्या कॉलमवर देखील नाना पाटेकर यांनी बोलत सर्वांची बोलती बंद केली होती.. जाणून घ्या नाना पाटेकर नेमकं काय म्हणालेले...

Nana Patekar : येताना धर्म घेऊन आलात का..., हिंदू - मुस्लिम वादावर नाना पाटेकरांनी सर्वांची बोलती बंद केली तेव्हा...
Nana Patekar
| Updated on: Oct 14, 2026 | 9:25 AM

Nana Patekar : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आता आपल्यात नाहीत, हाच फार मोठा धक्का आहे. नाना पाटेकर फक्त अभिनेते म्हणून नाही तर, एक व्यक्ती म्हणून देखील तितकेट ग्रेट होते… असं अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली देत म्हणाले आहेत. 8 ऑक्टोबर 2026 रोजी रोजी नाना यांनी अखेरचा श्वास घेतला आणि इंडस्ट्री पोरकी झाली. मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक भूमिका साकारणाऱ्या नाना पाटेकर यांनी कायम माणुसकीचा धर्म जपला.. त्यांनी अनेक प्रसंगी धर्म, जात आणि माणुसकी यांच्या महत्त्वाविषयी मोकळेपणाने भाष्य केलं. नानांनी हे देखील स्पष्ट केलं की त्यांचा धार्मिक ओळखीवर विश्वास नाही; ते स्वतःला सर्व गोष्टींच्या वर एक ‘माणूस’ मानतात.

सांगायचं झालं तर, 2016 मध्ये महाराष्ट्रातील एका शाळेतील कार्यक्रमासाठी नाना पाटेकर बोलावण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी धर्म आणि जातीच्या नावावर कोणाला विभागलं जाऊ नये… लोकांनी हिंदू, मुस्लिम अन्य जातीवर होत असलेल्या ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कार्यक्रमात नाना पाटेकर धर्माबद्दल स्पष्ट म्हणालेले.

Loading...

नाना पाटेकर म्हणालेले, ‘माझा धर्मावर विश्वास नाही, माझी जातीवर विश्वास नाही… आपण प्रत्येक जण भारतीय आहोत आणि आपला धर्मच भारतीय आहे… असं असताना आपल्याला हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन यांसारख्या धर्माची काय गरज आहे? जगात येताना आपण कोणता धर्म घेऊन आलोय का?’

एवढंच नाही तर, अधिकृत कागदपत्रांवर असलेल्या धर्म आणि जातीच्या कॉलमबद्दल देखील त्यांनी संताप व्यक्त केलेला. नाना पाटेकर म्हणालेले, ‘जर तुम्ही म्हणत आहात की, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, तर फॉर्मवर असलेला धर्म आणि जातीचा कॉलम का हटवला जातेय?’ या कार्यक्रमात नानांनी शालेय विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं की, सर्व धर्मांची शिकवण एकच संदेश देते. त्यांनी विद्यार्थ्यांना माणुसकीची जपणूक करण्याचे आणि तिलाच आपला खरा धर्म मानण्याचे आवाहन केलं.

प्रत्येकाच्या आत एक नायक आणि एक खलनायक दडलेला असतो; आता नायक बनायचे की खलनायक, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. जर तुम्ही माणुसकी जपली, तर तुम्हाला नक्कीच आत्मिक समाधान मिळेल… असे देखील नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं.. आज नाना पाटेकर जगात नसले तरी, त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us