Nana Patekar : नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर, अभिनेत्याच्या मित्रानं केअरटेकरला…

Nana Patekar Final Hours : नाना पाटेकर यांच्या मृत्यूच्या आधी काय झालेलं, याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर, अभिनेत्याच्या मित्रानं केअरटेकरला...
| Updated on: Oct 12, 2026 | 8:52 PM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे गोव्यात निधन झालं. काही दिवसांनंतर पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं स्पष्ट झालं आणि आता नाना पाटेकर यांच्या शेवटच्या काही तासांचा घटनाक्रमही समोर आला आहे.

वृत्तसंस्था पीटीआय (PTI) नुसार, ८ ऑक्टोबर रोजी पणजीजवळील डोना पौला येथील निवासस्थानी प्रकृती बिघडल्यानंतर नाना पाटेकर यांच्या केअरटेकरने गोव्यातील एका खाजगी रुग्णालयात संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, मणिपाल रुग्णालयातील डॉ. शेखर साळकर यांनी सांगितलं की, नाना पाटेकर यांनी पहाटे ३.३० च्या सुमारास एका मित्राला मेसेज पाठवून प्रकृती ठीक नसल्याचं कळवलं होतं. त्या मित्रानं पहाटे ४ वाजता मेसेज पाहिला आणि तातडीनं नानांच्या घरी धाव घेतली. नाना पाटेकर यांच्या मित्रानं केअरटेकरला रुग्णवाहिका आणण्यासाठी पाठवलं. त्यानंतर केअरटेकर रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यासाठी रुग्णालयात गेला.

Loading...

नाना पाटेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर (CPR) दिला, परंतु नानांना वाचवता आलं नाही. पहाटे ५.१० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण

त्यानंतर नानांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMCH) मध्ये नेण्यात आलं. पीटीआयच्या माहितीनुसार, अहवालात नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण ‘अथेरोस्क्लेरोटिक ऑक्लुसिव्ह कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे (धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करणारा आजार) हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीत रक्ताची गाठ निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. नाना पाटेकर यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी जीएमसीएचच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी या निष्कर्षांना दुजोरा दिला.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ, लोकसभा खासदार सुनील तटकरे, ‘नाम’ (NAAM) फाउंडेशनचे सह-संस्थापक मकरंद अनासपुरे, एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक कलाकार आणि नेते नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us