Nana Patekar: दारू पिण्यासाठी नाना पाटेकरांचे अजबच नियम! थेटच म्हणाले…
Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर कायम त्यांच्या स्पष्ट भूमिकांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी दारू पिण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मला दारू प्यायाची असेल तर, मी पिणार... असं म्हणत त्यांनी बॉलिवूडबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

Nana Patekar: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी फक्त मराठी सिनेविश्वातच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील एकापेक्षा एक सिनेमे साकारात चाहत्यांचं मनोरंजन केलं. नाना पाटेकर फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर, स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात. आतापर्यंत नाना पाटेकर यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली आहे. दरम्यान एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी दारूबद्दल आणि बॉलिवूडच्या पार्ट्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नाना पाटेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
सांगायचं झालं तर, 2024 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत अभिनेते अनिल कपूर यांनी नाना पाटेकर यांना विचारलं, ‘तुम्ही पार्ट्यांमध्ये का दिसत नाही?’, यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘मला दारू प्यायची असेल तर पार्ट्यांना जाण्याची काय गरज आहे? मी घरीच दारू आणून पिऊ शकतो…’, एवढंच नाही तर, पार्ट्यांमध्ये होणाऱ्या भेटीगाठींबद्दल देखील नाना पाटेकर स्पष्टच म्हणाले.
‘पार्ट्यांमध्ये गेल्यानंतर काही वाईट लोकं भेटतात, जे तुमच्याशी वाईट गोष्टी बोलतात आणि तुमचा मूड खराब करतात. त्यामुळे घरीच दारू आणून प्यायलेलं चांगलं होतं…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले. यावेळी अनिल कपूर यांनी नाना पाटेकर यांच्या रागीट स्वभावाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
नाना पाटेकर म्हणाले, ‘हे रागाबद्दल नाही… जर कोणी तुमच्याशी गैरवर्तन करणार असेल तर, साहजिकच त्याला त्याची किंमत मोजावी लागेलच… सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी असा माणूस आहे की, अशा व्यक्तीला दोन फटके देण्यापूर्वी मी दोनदा विचार देखील करणार नाही..’, असं देखील नाना पाटेकर म्हणाले.
नाना पाटेकर यांच्या तिव्र प्रतिक्रियेनंतर अनिल कपूर यांनी विचारलं की, भांडण सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी शारीरिक आक्रमकतेचा मार्ग अवलंबण्याची काही गरज नाही… ‘प्रत्येकाला मारायची गरज तर नाही. प्रेमानेही समजावून सांगू शकता…’, यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘समोरची व्यक्ती त्या स्थितीत असयला हवी, तिला प्रेम स्वीकारता यायला हवं… जर ती व्यक्ती त्या स्थितीतच नसेल, तर प्रेम कसं स्वीकारणार?’ असं देखील नाना पाटेकर मुलाखतीत म्हणालेले.