Nana Patekar: गरोदर असताना त्यांनी माझी…, नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाली सोनाली कुलकर्णी?

Nana Patekar: मराठी सिनेविश्वातील प्रत्येक कलाकाराच्या नाना पाटेकर यांच्यासोबत खास आठवणी आहेत. अनेकांनी त्यांच्या आठवणी सांगत, श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील नानांसोबत तिच्या खासगी आठवणी सांगितल्या...

Nana Patekar: गरोदर असताना त्यांनी माझी..., नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाली सोनाली कुलकर्णी?
Nana Patekar Sonali Kulkarni
| Updated on: Oct 10, 2026 | 3:12 PM

Nana Patekar: सांगायचं झालं तर अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) यांचे कायम छोटे – मोठे वाद व्हायचे… पण तेवढंच चांगलं त्यांचं नातं देखील होतं. वाद झाल्यानंतर दोघे एकमेकांसोबत तितक्याच प्रेमाने बोलायचे देखील… आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सोनाली हिने त्यांच्यासोबत असलेल्या खास आठवणी राहतात… ज्या खरंच खूप भावूक करणाऱ्या आहे..

‘ते कधीच वाद लक्षात ठेवत नव्हते…’

Loading...

नाना पाटेकर यांच्यासोबत ‘टॅक्सी नंबर 9211’, ‘देऊळ ‘आणि ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ या सिनेमांमध्ये काम करणारी सोनाली म्हणते, ‘मन मानायलाच तयार नाही की, नाना सर आता आपल्यात नाही. छोट्या – छोट्या कारणांमुळे आमची कायम भांडणं व्हायची… पण ते कधीच वाद लक्षात ठेवयाचे नाही. त्यांचं साहित्यावर प्रचंड प्रेम होतं. कधीही भेटल्यानंतर त्यांचा एकच प्रश्न असायचा आणि तो म्हणजे, सध्या काय वाचत आहेस…’

नाना पाटेकरांना मालिका पाहायला आवडायचं…

सोनाली कुलकर्णी पुढे म्हणाली, ‘तुम्ही हैराण व्हाल, पण नाना सरांना मालिका पाहायला प्रचंड आवडायचं… स्वयंपाक करायला देखील त्यांना फार आवडायचं… पहिल्यांदा जेव्हा ते माझ्या घरी आलेले, तेव्हा मी त्यांना विचारलेलं काय बनवू तुमच्यासाठी, तर त्यांनी सांगितलं, साबुदाण्याची खिचडी आणि पोहे बनव… जेव्हा मी त्यांना बनवून दिले, तेव्हा ते रागात म्हणाले, हे असं बनवत नाही… तर मी देखील म्हणाले, हो तुम्ही बरोबर बोलत आहात…’

‘गरोदर असताना नानांनी घेतली काळजी…’

सोनाली म्हणाली, “पहिल्यांदा मी त्यांना एनसीपीएमध्ये लांबून पाहिले होते. ते डॉक्टर जब्बार पटेल यांच्यासाठी एक डॉक्युमेंट्री शूट करत होते, जी कुसुमाग्रजांच्या मराठीत अनुवादित केलेल्या ‘ओथेलो’ नाटकावर आधारित होती. मी तिथे उपस्थित होते, कारण त्यानंतर मला तिथे एक कविता सादर करायची होती. जेव्हा आम्ही ‘देऊळ’ सिनेमा केला होता, त्या काळात मी गर्भवती होते, तेव्हा त्यांनी माझी खूप काळजी घेतली होती. जेव्हाही फोन करायचे, प्रत्येक वेळी माझ्या पती आणि मुलीबद्दल विचारपूस करायचे. त्यांनी समाजाला खूप काही दिलं, प्रेम दिलं, त्याच्या बदल्यात कधीच कोणती अपेक्षा केली नाही. मला वाटतं की ही शिकण्यासारखी गोष्ट आहे.’, नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सिनेविश्वावर मोठी शोककळा कोसळली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us