Onkar Bhojane: अतिशय अनप्रोफेशनल, खोटारडा… दिग्दर्शकाचे ओंकार भोजनेवर गंभीर आरोप
Onkar Bhojane: ओंकार भोजनेवर अनेक आरोप होत आहेत, दिग्दर्शकाने त्याला पुढील चित्रपताट कामच देणार नाही असे म्हणाले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम असून त्यातील कलाकारांचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. या कार्यक्रमासह यातल्या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केलंय. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला कलाकार म्हणजे ओंकार भोजने. आपल्या स्किट्सनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ओंकार भोजने याने मधल्या काळात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून एग्झिट घेतली होती. त्यानंतर ओंकारने रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री घेतली आणि आपल्या अभिनयाची छाप सोडली. आता दिग्दर्शकाने ओंकारवर गंभीर आरोप केले आहेत.
ओंकारचा ‘अफरातफरी’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधीच सिनेमाच्या टीममध्ये मोठा राडा झाल्याचे समोर येत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘अफरातफरी’ सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजनेवर गंभीर आरोप केले आहेत. ‘अफरातफरी’ सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि टीम यांनी मुलाखत दिली. यावेळी सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला ओंकार भोजने यावेळी अनुपस्थित होता. या मुलाखतीत बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ओंकार भोजनेवर टीका केली आणि म्हणाले की, हे अतिशय अनप्रोफेशनल.”
दिग्दर्शक मिलिंद कवडे म्हणाले की, “जे प्रोफेशनल कलाकार आहेत, ते सगळे बरोबर वेळ पाळतात… आताही संजय नार्वेकर प्रमोशनला येत आहेत, पण, जे नवीन कलाकार आहेत त्यांनी उदाहरण घ्यावे, ओंकारला आम्ही जूनमध्ये सांगितले होते की, “ऑक्टोबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय. माझा EP ने त्याला कॉन्टॅक्ट करत आहेत, मी सुद्धा त्याला अनेक फोन केला होते. पण तो एवढा बिझी आहे की, तो कोणाचेही फोन उचलत नाहीये. कॉल 1 केल्यावर त्याचा एका टेम्प्लेट मेसेज येतो, ‘दादा मी तुला कॉलबॅक करतो’ पण गेले चार महिने काय एकही कॉल आलेला नाही.”
मिलिंद कवडे पुढे बोलताना म्हणाले की, “शेवटी, निर्मात्यांनी कंटाळून ओंकारला एक लेटर पाठवलंय की, बाबा रे आम्ही चित्रपट महामंडळात जायचं का? तू लक्षच घालत नाहीये. अजूनही त्याने स्पष्ट सांगितले नाही की तो येणार आहे की नाही… एखाद्या लटकवून ठेवणं म्हणताता. बरं एका सिनेमासाठी निर्मात्याने कोटी रुपये गुंतवलेले असतात. तुम्ही निदान प्रमोशनसाठी एक व्हिडिओ तरी पाठवा. आता मोहन आगाशे सर मध्यंतरी हैदराबादला होते, पण त्यांनी तिथून त्यांचा व्हिडिओ पाठवला. आजही ते स्वतः प्रमोशनला उपस्थित राहिले. त्यामुळे आता मी कानाला खडा लावलाय, मी पुढच्या सिनेमात ओंकारला कास्ट करणार नाही. एक कलाकार म्हणून तो उत्तम आहेच..पण, माणूस म्हणून सॉरी! अतिशय अनप्रोफेशनल… तो सराईत खोटारडा आहे…”, असा आरोप दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us