शाहरुख खानच्या बंगल्यात मुक्काम करण्याची संधी; मिळेल सुपरस्टारसारखा अनुभव, एका दिवसाचे भाडे किती?

शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आता शाहरूखच्या आलिशान बंगल्यात मुक्काम करता येणार आहे. होय, शाहरूखचा बंगला आता भाडेतत्वावर उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या बंगल्यात राहून त्याच्यासारखंच लॅविश जगण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता. किती आहे पण शाहरूखच्या बंगल्याचे एका रात्रीचे भाडे?

शाहरुख खानच्या बंगल्यात मुक्काम करण्याची संधी; मिळेल सुपरस्टारसारखा अनुभव, एका दिवसाचे भाडे किती?
Opportunity to live in Shah Rukh Khan Beverly Hills mansion, how much is the rent?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 16, 2025 | 2:48 PM

बॉलिवूडचा बादशाह ‘शाहरुख खान’ला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. जगभरात त्याचे चाहते आहेत जे त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. अशा परिस्थितीत, शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांना ‘लॅविश जगण्याचा’ आनंद देण्यासाठी शाहरूक आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी खास घेऊन आला आहे. ती खास गोष्ट ही आहे की आता शाहरूखच्या बंगल्यात राहण्याचा आनंद घेता येणार आहे.होय, शाहरूखने त्याचा बंगला आता भाड्याने दिला आहे.

बेवर्ली हिल्स, लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया, यूएसए) येथे त्यांचा एक अतिशय सुंदर बंगला आहे, जो त्यांच्या सर्वात खास मालमत्तांपैकी एक आहे. बातमीनुसार, शाहरुख खानचा हा आलिशान बंगला आता भाड्याने दिला जात आहे. आता हा बंगला Airbnb वर भाड्याने उपलब्ध आहे.

शाहरूखचा बंगला आता भाडेतत्त्वावर उपलब्ध

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे घर “मन्नत” बद्दल तर सतत चर्चा होतच असते. पण तुम्हाला माहिती आहे का की त्याचा लॉस एंजेलिसमध्ये देखील एखाद्या राजवाड्यासारखा बंगला आहे. आता चाहत्यांना या राजवाड्यात रात्र घालवण्याची संधी मिळू शकते. ‘आर्किटेक्चरल डायजेस्ट’ नावाच्या मासिकानुसार, तसेच ईटाइम्समध्ये आलेल्या वृत्तानुसार, या भव्य बंगल्यात सहा आलिशान बेडरूम, एक स्विमिंग पूल, जकूझी (गरम पाण्याचा टब), कॅबाना (पूलसाइड बसण्याची जागा) आणि टेनिस कोर्ट आहे. हे अनेकांसाठी स्वप्नातील घर असेल आणि आता ते आता भाड्याने उपलब्ध करून दिले जात आहे.

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठीही तर आयुष्यातील सुवर्णसंधी असेल ज्याचा विचारही त्यांनी कधी केला नसेल. शाहरूखच्या या राजवाड्यात अगदी लॅविश आयुष्य जगण्याचा आनंद घेता येईल. तथापि, ज्यांना बॉलिवूड स्टारच्या आलिशान राजवाड्यात राहायचे आहे त्यांना त्यासाठी काही रक्कमही नक्कीच मोजावी लागणार आहे.

शाहरुख खानच्या बंगल्याचे भाडे किती?

रिपोर्टनुसार शाहरुख खानच्या बंगल्यात एका रात्रीचा मुक्काम करायचा असेल तर सुमारे 2 लाख रुपये भाडे आहे. ज्यांना या भव्य राजवाड्यात एक रात्र राहण्याची इच्छा असेल त्यांना प्रति रात्र सुमारे 1,96,891 भाडे आहे.

शाहरुख खानचा भव्य बेवर्ली हिल्स बंगला खूपच सुंदर आणि डोळ्यांना सुखावणारा आहे. त्याची स्वतःची एक वेगळी शैली आहे जी खूपच सुंदर दिसते. बंगल्यात नवीन आणि जुन्या गोष्टींचे सुंदर सजावट आहे. बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानने 2019 मध्ये एक्सवर (पूर्वी ट्विटर) या आलिशान बंगल्याचे अनेक फोटो शेअर केले होते. शाहरुखच्या राजवाड्यात 6 आलिशान बेडरूम आहेत. स्विमिंग पूल आणि टेनिस कोर्ट आहे,आकर्षक इंटीरियर आहे. यासोबतच, ताडाच्या झाडांनी वेढलेले एक सुंदर ठिकाण देखील घराच्या भोवती आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या घरात मुक्काम करण्याचा अनुभव हा नक्कीच रोमांचक असेल यात शंका नाही.

बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये घर रेंटवर देण्याचा ट्रेंड

दरम्यान शाहरुख खाननंतर, बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये घर रेंटवर देण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. खरं तर, शाहरुखच्या आधीही अनेक स्टार्सनी त्यांची वैयक्तिक घरे रेंटवर दिली आहे. त्यापैकी एक जान्हवी कपूर आहे, जिने अलीकडेच तिचे चेन्नईतील सुंदर घर तिच्या भाड्याने उपलब्ध करून दिले आहे. हे घर तिची आई श्रीदेवीच्या आठवणींनी भरलेले आहे