पितृपक्षापूर्वीच शुटर्सनी मुंबईत… टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा, थेट..
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर एकच मोठी खळबळ उडाली. टायगर श्रॉफ या हल्ल्यात जखमी झाला. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे येत आहे. टायगर श्रॉफ याच्या गोळीबारावर झालेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली. भर रस्त्यावर अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी गाडीत चारजण होते. अभिनेता टायगर श्रॉफ जखमी असल्याची माहिती मिळतंय. ही घटना घडवण्यासाठी पल्सर बाईकचा वापर करण्यात आला होता. ही पल्सर बाईक काल रात्री अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनजवळून जप्त करण्यात आली. रात्री ही बाईक डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. या बाईकच्या मालकालाही बोलावण्यात आले आहे. पल्सर बाईकचा पहिला मालक जोगेश्वरी भागातील आहे. त्याने ती दुसऱ्या कोणालातरी विकली आणि दुसऱ्या मालकाने ती तिसऱ्या मालकाला विकली. गोळीबार करणाऱ्यांनी तिसऱ्या मालकाकडून बाईक खरेदी केली, परंतु कागदपत्रांचे हस्तांतरण केले नाही.
बाईकच्या मालकाची चौकशी सुरू आहे. पितृपक्षापूर्वी शूटरनी तिसऱ्या मालकाकडून बाईक घेतली होती. बाईकची कागदपत्रे हस्तांतरित झाली नव्हती. नवरात्रीनंतर कागदपत्रांच्या हस्तांतरणाबाबत चर्चा झाली.तिसऱ्या मालकाला पैसे मिळाले होते. टायगर श्रॉफ याच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबारासाठी हल्लेखोरांनी गावठी पिस्तूल वापरल्याचा संशय आहे.
फॉरेन्सिक विभागाच्या प्राथमिक तपासणीत गावठी पिस्तुल म्हणजेच (कॉपी पीस) मधून फायरिंग केल्याचा संशय. हल्लेखोरांनी एकूण सात ते आठ गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी पाच गोळ्या कारला लागल्या, तर दोन गोळ्याचे टार्गेट चुकले.. पाचवी गोळी झाडल्यानंतर दुसऱ्या शूटरने टायगर श्रॉफवर जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल जाम झाल्याने चालवू शकला नाही असा अंदाज.
गोळीबारापूर्वी आरोपींनी परिसराची रेकी केली होती, पुष्पा पार्कजवळ सुमारे 45 मिनिटे थांबल्याची सूत्रांची माहिती. घटनेनंतर दोन्ही हल्लेखोर तिसऱ्या साथीदाराने तयार ठेवलेल्या मोटारसायकलवरून फरार झाले. अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पोलीस चौकीच्या परिसरात मोटारसायकल सोडून आरोपी पसार झाले.ते नक्की कुठे गेले, याचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपी मुंबईबाहेर सुरतच्या दिशेने फरार झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.