करुन करुन भागली अन् देवपूजेला लागली..; प्रेमानंद महाराजांसमोर अभिनेत्री ढसाढसा रडली

सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडणाऱ्या अभिनेत्रीला अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात रडताना पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

करुन करुन भागली अन् देवपूजेला लागली..; प्रेमानंद महाराजांसमोर अभिनेत्री ढसाढसा रडली
पूनम पांडे, प्रेमानंद महाराज
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 25, 2026 | 1:09 PM

अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांचं दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी असंख्य भाविक दररोज वृंदावनला जातात. यात सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा समावेश असतो. विराट कोहली-अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, राजपाल यादव, कुमार सानू यांसारखे अनेक सेलिब्रिटी आजवर प्रेमानंद महाराजांच्या भेटीला पोहोचले होते. त्यानंतर आता अशा एका मॉडेल आणि अभिनेत्रीला वृंदावनमध्ये पाहिलं गेलं, जी तिच्या बोल्ड व्हिडीओंमुळे आणि वादग्रस्त खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. ही मॉडेल आणि अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून पूनम पांडे आहे.

‘विरल भयानी’ या पापाराझी अकाऊंटवर पूनम पांडेचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये ती मन लावून त्यांचं प्रवचन ऐकताना दिसतेय. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती भावूक होऊन रडताना दिसतेय. आणखी काही फोटो आणि व्हिडीओंमध्ये ती वृंदावनमध्ये फिरताना दिसतेय. नेहमी तोकडे कपडे घालणारी आणि अंगप्रदर्शन करणारी पूनम यावेळी पात्र पारंपरिक पोशाखात दिसली. पूनमच्या या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘एका टप्प्यानंतर ईश्वराच्या चरणीत शांती मिळते’, असं एकाने लिहिलं. तर ‘देव भक्ताची फक्त भक्तीच पाहतो’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘देव तुला सदबुद्धी देवो’, अशीही कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. तर ‘करून करून भागली अन् देवपूजेला लागली’, अशा शब्दांत काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं आहे.

पूनम तिच्या वादग्रस्त खासगी आणि व्यावसायिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. पती सॅम बॉम्बेवर तिने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. याशिवाय तिचं नाव एका पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणातही आलं होतं, ज्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचाही समावेश होता. पूनमने राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांवर फसवणूक, चोरी आणि तिचे फोन नंबर लीक केल्याचा आरोप केला होता. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पूनम म्हणाली होती, “मला काम मिळत नव्हतं म्हणून मी कॉन्ट्रोव्हर्सी केली. मला कामाची खूप गरज होती. काही गोष्टींवर मी डोळे मिटून विश्वास केला. कोणीही मला म्हटलं की एखादी गोष्ट कर किंवा ते केल्याने तुझ्या करिअरला फायदा होईल, तर ते मी आंधणेपणानं करायचे. नंतर माझ्या लक्षात आलं की माझे ते निर्णय चुकीचे होते.”