‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अमेरिकेतही जपतेय भारतीय परंपरा, मुलीला शिकवला हा मंत्रोच्चार, Video Viral

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने नेहमीच आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रियंका ही तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती शेअर करत असते. आता नुकताच शेअर केलेला व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा अमेरिकेतही जपतेय भारतीय परंपरा, मुलीला शिकवला हा मंत्रोच्चार, Video Viral
| Updated on: Aug 04, 2026 | 3:43 PM

प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवले आहे. प्रियंकाने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रियंका सध्या भारतात राहत नाही, ती अधून मधून भारतात येत असते. ती तिचा पती निक जोनससोबत अमेरिकत स्थायिक झाली आहे. अमेरिकन गायक निक जोनशी विवाह केला असला तरीही ती भारतीय परंपरा काही विसरलेले नाही. ती नेहमीच आपल्या रुढी, परंपरा, रिती जपताना दिसते. आता नुकताच प्रियंकाचा तिच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यात ती आपल्या मुलीला दुर्गा सप्तशक्तीचे मंत्र शिकवत आहे. आता प्रियंकाच्या या कृतीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

प्रियांका चोप्राने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यात तिने आपली दोन रूपे दाखवली आहेत आणि लिहिले आहे की ती ‘मामा’ आणि ‘मामासिटा’ दोन्ही आहे. व्हिडिओच्या पहिल्या भागात प्रियंका आपली मुलगी मालतीला दुर्गा सप्तशतीचे मंत्र शिकवत आहे, तर दुसऱ्या भागात ती एका सुंदर ड्रेसमध्ये नाचत आहे. प्रियांका चोप्राने 2018 मध्ये राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये निक जोनासशी लग्न केले. लग्नाआधी ते काही काळ नात्यात होते. 2022 मध्ये, प्रियांका सरोगसीद्वारे तिची मुलगी मालती मेरीची आई झाली. तेव्हापासून, प्रियांका आणि निक दोघेही मालतीसोबतच्या त्यांच्या सुंदर आणि अविस्मरणीय क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

अलीकडेच एका मुलाखतीत, प्रियंकाने आपली मुलगी मालतीच्या भोवती सुरक्षा तैनात करण्याबद्दल सांगितले. हे का आवश्यक होते हे तिने स्पष्ट केले. ‘व्हेरायटी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “कोणी माझ्या जवळ येऊन फोटो काढल्यास मला काही हरकत नाही. पण हे सुरक्षा रक्षक हे सुनिश्चित करण्यासाठी आहेत की माझ्या संमतीशिवाय कोणतेही रेकॉर्डिंग होऊ नये. असे अनेकदा घडते, विशेषतः माझ्या मुलीसोबत, आणि आम्ही पार्कमध्ये असतो किंवा आईस्क्रीम खात असतो, आणि अचानक मला तो व्हिडिओ ऑनलाइन दिसतो. म्हणूनच मी सुरक्षा ठेवली आहे. नाहीतर, मला त्याची गरज नाही. मला कोणी मारणार नाही.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us