वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी 400 कॅमेरे, त्यांना मजाच..; प्रमोद महाजनांबद्दल बोलताना राहुल महाजनला अश्रू अनावर

नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत राहुल महाजन त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. वडिलांच्या निधनानंतर परिस्थिती कशी होती, याचाही खुलासा त्याने केला.

वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी 400 कॅमेरे, त्यांना मजाच..; प्रमोद महाजनांबद्दल बोलताना राहुल महाजनला अश्रू अनावर
Rahul Mahajan and Pramod Mahajan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2026 | 8:54 AM

टेलिव्हिजन अभिनेता आणि राजकीय नेता राहुल महाजनच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. वडील प्रमोद महाजन यांच्या निधनाचा धक्का, त्यानंतर आलेल्या अडचणी आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष याबद्दल राहुलने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये मन मोकळं केलं. जुन्या आठवणी सांगताना त्याला अश्रू अनावर झाले. वडिलांच्या निधनानंतरचा तो कठीण काळ आजही त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारा असल्याचं त्याच्या बोलण्यातून जाणवलं. विशेषतः वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी घातलेला गराडा आणि त्या परिस्थितीत झालेला मानसिक त्रास याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली.

वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी 400 कॅमेऱ्यांचा गराडा

राहुल महाजनने सुभोजित घोष यांच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील अनेक कटू अनुभव सांगितले. वडिलांचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर तो घाईघाईने रुग्णालयात पोहोचला होता. त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया टिपण्यासाठी अनेक छायाचित्रकार आणि कॅमेरामन त्याच्याभोवती जमले होते. रुग्णालयातून बाहेर पडताना जवळपास 15 कॅमेरे चेहऱ्यासमोर असल्याचं त्याने सांगितलं. दुःखाच्या क्षणी आपल्याला सावरण्याची संधी देण्याऐवजी प्रत्येकजण प्रतिक्रिया टिपण्याच्या प्रयत्नात होता, अशी खंत त्याने व्यक्त केली. त्या क्षणी मला खूप अस्वस्थ वाटलं. 15-20 लोक माझ्या चेहऱ्यावर येऊन माझे फोटो काढत होते. ज्याला जितके चांगले हावभाव टिपता येत होते, त्याला तितकी मजा येत होती, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

Loading...

वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी तर जवळपास 400 कॅमेरे असल्याचं राहुलने सांगितलं. आपल्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायी प्रसंगांपैकी एक असलेल्या या घटनेची आठवण सांगताना तो भावूक झाला. एखाद्या व्यक्तीच्या दुःखापेक्षा तिच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्याला अधिक महत्त्व दिलं जात असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

वडील प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर आयुष्यात यापेक्षा वाईट काय घडणार, असं आपल्याला वाटलं होतं, असं राहुलने सांगितलं. मात्र, त्यानंतरही आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या महिन्याभरातच त्याला तिहार तुरुंगात जावं लागलं. आपल्या आयुष्यात अनेक वेदनादायी प्रसंग आले असून, आपल्याला खूप त्रास सहन करावा लागल्याचंही राहुलने यावेळी सांगितलं. काही अनुभवांबद्दल बोलताना तो भावूक झाला.

राहुल महाजनच्या वैयक्तिक आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली आहे. त्याच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची तीन लग्नं. राहुलने पहिलं लग्न श्वेता सिंहशी केलं होतं. त्यानंतर त्याने डिंपी गांगुलीशी विवाह केला. त्याचं तिसरं लग्न नतालिया इलीनाशी झालं. मात्र, या तिन्ही वैवाहिक नात्यांचा शेवट घटस्फोटात झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us