Ranbir Kapoor: अखेर अंत सच्चाई का होता है…चुकीचं बोलणं रणबीर कपूरला महागात पडलं, आता अभिनेत्याला थेट…
Ranbir Kapoor Ramayan Movie Promotion: रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट रामायण लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या पूर्वी रणबीर कपूरला सर्वांची माफी मागावी लागली.

Ranbir Kapoor Ramayan Movie: रणबीर कपूर ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वत्र फिरत आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. दसऱ्यानिमित्त कोलकात्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी रणबीर कपूरकडून भाषणात एक मोठी चूक झाली.
चेन्नईतील कार्यक्रमात रणबीर म्हणाला, “दसऱ्याच्या कार्यक्रमात बोलताना माझ्याकडून चूक झाली. मला असे म्हणायचे होते की, वाईट कितीही शक्तिशाली असले तरी, शेवटी चांगुलपणा आणि सत्याचाच विजय होतो. ही ओळ मला ‘रॉकस्टार’मधील ए. आर. रहमान सरांसोबतच्या माझ्या कामाची आठवण करून देते, जिथे मी म्हणालो होतो, ‘जो भी मैं कहना चाहूं बर्बाद करदे अल्फाज मेरे..’ त्यामुळे, मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो.”
कोलकात्यातील दसऱ्याच्या कार्यक्रमात रणबीर म्हणाला, “दसरा साजरा करण्यासाठी कोलकात्यात येणे हा एक मोठा आनंद आणि सौभाग्य आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. दसरा आपल्याला आठवण करून देतो की वाईट कितीही शक्तिशाली असले तरी, शेवटी सत्य आणि चांगुलपणाचाच अंत होतोच, म्हणून, प्रेम पसरवा, आनंद वाटा आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. रामायण टीमच्या वतीने, मी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्री राम.”
या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. नमित मल्होत्रा निर्माते आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर, प्रेक्षकांना जिओ हॉटस्टारवरील ‘पे-पर-व्ह्यू’ फीचरद्वारे चित्रपट खरेदी करून पाहण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल. पहिला भाग ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग पुढच्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होईल. पुढच्या वर्षी, ‘रामायण २’ प्रभासच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटाशी टक्कर देणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंग आणि विवेक ओबेरॉय यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकांनी अॅडव्हान्स बुकिंग केल्यामुळे कोट्यवधी रुपये कमवले आहेत.