Richest South Indian actor: सगळ्यात श्रीमंत दाक्षिणात्य सुपरस्टार कोण? संपत्तीचा आकाडा ऐकून धक्काच बसेल
Richest South Indian actor: दाक्षिणात्य सिनेमांचे जगभरात चाहते असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेथील कलाकारांची क्रेझ देखील जगभरात पाहायला मिळत आहे. आता या कलाकारांमधील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हिंदी सिनेमा असो वा साउथ सिनेमा, आज दोन्हीही इंडस्ट्रींचे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला खूप आवडतात. अशात जेव्हा बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार्सच्या नावांची चर्चा होते, तेव्हा सर्वात आधी शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अक्षय कुमार यांसारखे स्टार्स येतात. तर साउथमध्ये रजनीकांत, महेश बाबू आणि चिरंजीवी यांसारख्या स्टार्सची नावे आठवतात. याचदरम्यान आता २०२६ च्या सर्वात श्रीमंत स्टार्सची यादी समोर आली आहे. या यादीत साउथचे चार अभिनेते समाविष्ट आहेत. चला पाहूया या यादीत साउथचे आणखी कोणते स्टार्स आहेत आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे?
हा आहे साउथचा सर्वात श्रीमंत अभिनेता
डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या संपत्तीच्या अंदाजानुसार, चार तेलुगू स्टार्स नागार्जुन अक्किनेनी, चिरंजीवी, वेंकटेश डग्गुबती आणि राम चरण यांनी देशातील १० सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत शाहरुख खान १०,००० कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहे. पण दुसरे स्थान कोणत्याही बॉलिवूड स्टारला न मिळता नागार्जुनला मिळाले आहे, ज्यांची अंदाजे संपत्ती ५,००० कोटी रुपये आहे. टॉप १० मध्ये चार साउथ अभिनेते चिरंजीवी (१७०० कोटी), वेंकटेश डग्गुबती (१६५० कोटी) आणि राम चरण (१४०० कोटी) यांचीही नावे आहेत.
साउथ स्टार्सचे वर्कफ्रंट
कामाविषयी बोलाचे झाले तर नागार्जुन शेवटचा ‘कुली’ सिनेमामध्ये दिसला होता. त्यांचा आगामी अनटायटल्ड चित्रपट ‘किंग १००’ आहे. हा नागार्जुनचा १००वा चित्रपट आहे. तर चिरंजीवी ‘काका’ आणि वेंकटेश डग्गुबती ‘आदर्श कुटुंबम हाऊस नंबर ४७’मध्ये दिसणार आहेत. वेंकटेशचा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज होण्यासाठी तयार आहे. ते ‘जनवरी १२ विदुदाला’ या चित्रपटातही दिसणार आहेत, जो संक्रांतीच्या निमित्ताने रिलीज केला जाणार आहे.
तसेच राम चरण नुकताच ‘पेद्दी’मध्ये दिसला होता. हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. ‘पेद्दी’नंतर आता राम चरण सुकुमारसोबत पुढचा चित्रपट करणार आहेत. ‘रंगस्थलम’नंतर सुकुमार दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत. मात्र चित्रपटाचे टायटल अजून जाहीर झालेले नाही. तरीही चाहत्यांना या मूव्हीबद्दल खूप उत्सुकता आहे. शाहरुखबद्दल बोलायचे तर तो लवकरच ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे, जो ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. या मूव्हीमध्ये त्याच्यासोबत मुलगी सुहाना खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.