Riteish Deshmukh – Genelia D’Souza: विलासराव देशमुख यांना पहिल्या भेटीतच काय म्हणालेली जिनिलिया? रितेशही झालेला थक्क

Riteish Deshmukh - Genelia D'Souza: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता जिनिलिया आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगातलं आहे. तेव्हा रितेश थक्क झालेला.

Riteish Deshmukh - Genelia DSouza:  विलासराव देशमुख यांना पहिल्या भेटीतच काय म्हणालेली जिनिलिया? रितेशही झालेला थक्क
Riteish Deshmukh Genelia DSouza
| Updated on: Sep 21, 2026 | 1:04 PM

Riteish Deshmukh – Genelia D’Souza: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख आज चाहत्यांना कपल्स गोल्स देताना दिसतात. सांगायचं झालं तर, रितेशच्या कुटुंबियांसोबत जिनिलिया हिची बॉन्डिंग फार चांगली आहे. जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जिनिलिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जेव्हा रितेश आणि जिनिलिया यांचं लग्न झालं तेव्हा विलासराव देशमुख देखील फार आनंदी होते.

दरम्यान, एका मुलाखतीत रितेश याने वडील विलासराव देशमुख आणि जिनिलिया यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होते. तेव्हा जिनिलिया आणि विसालराव देशमुख यांच्यामध्ये घडलेला मजेदार किस्सा सांगितला. मुलाखतीत रितेश म्हणाला, ‘2001 – 2002 सालची एक गोष्ट आहे. आम्ही सिनेमाचं शुटिंग करत होतो. ‘तुझे मेरी कसम’ सिनेमाचं शुटिंग सुरु होतं. त्यावेळस जिनिलिया कॉलेजमध्ये होती आणि मी आर्किटेक्टचं काम करत होतो.’

‘सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर घरी येणं – जाणं सुरु असायचं. त्यावेळे साहेब मुख्यमंत्री होते. वर्षाच्या मागच्या लॉनमध्ये बसलेलो… आमच्यासोबत दोन – तीन मित्र होते. पाठीमागे ऑफिस आहे आणि रेसिडेन्सला जायला एक कॉरिडोअर आहे. साहेबांनी तिथलं काम संपवलं आणि तेथून जात होते. माझं लक्ष नव्हतं… ते शांतपणे जात होते. तेव्हा या (जिनिलिया) उठल्या आणि जोरात हात मारली, हाय अंकल!!’

‘माझे वडील देखील म्हणाले, ‘हॅलो… हॅलो बेटा…’, जिनिलिया यांनी विचारलं ‘हाऊ आर यू?’ तेही म्हणाले, ‘आय एम फाईन… यू ओके…’, यावर जिनिलिया म्हणाली, ‘व्ही आर गुड…’, रितेश पुढे म्हणाला, वडिलांनी विचारलं ‘तुम्हाला काय पाहिजे काय?’ त्यावर जिनिलिया म्हणाले, ‘नाही नाही… सगळं काही ठिक आहे. ओके?’

पुढे रितेश देशमुख म्हणाला, ‘मी असं कधीच माझ्या मित्रांना पाहिलं नाही, की ते माझ्या वडिलांना ‘हॅलो अंकल’ एवढ्या जोरात बोलतायत… मी म्हणालो, एवढ्या जोरात का बोललीस? मी स्वतः दचकलेलो…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश आणि जिनिलिया यांची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us