रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार… कसा रचला घटनेचा कट? आरोपी… स्कूटी… 4 महिन्यांपूर्वी काय शिजलेलं?

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबारानंतर पोलीस कसून चौकशी करत आहेत. आता चौकशीत पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे. घटनेचा कट कसा रचला याबद्दल देखील माहिती समोर आली आहे. शिवाय 4 महिन्यांपूर्वी काय शिजलेलं? याचा देखील मोठा खुलासा झाला आहे.

रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार... कसा रचला घटनेचा कट? आरोपी... स्कूटी... 4 महिन्यांपूर्वी काय शिजलेलं?
Rohit Shetty
| Updated on: Feb 03, 2026 | 8:43 AM

बॉलिवूडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय घरांवर गोळीबाराची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक राहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गुंड लोरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बिश्नोई गँगने घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. आता याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीच्या घराबाहेर करण्यात आल्या गोळीबाराचा कट 4 महिन्यापूर्वीच शिजला होता.

गोळीबारासाठी वापरलेली स्कुटी 4 महिन्याधीच आरोपीनी खरेदी केली होती. आरोपी अमान मरोटे याने ही बाईक उर्वरीत दोन आरोपींना दिली. त्यांनी ही बाईक मुंबईत येऊन मुख्य शूटरला पोहोचवली होती. हीच बाईक घेऊन आरोपी रोहित शेट्टीच्या घरापर्यंत गेला आणि तिथे जाऊन शेट्टीच्या घरावर गोळीबार केला.

पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केलेली आहे ज्यामध्ये दोन आरोपी फरार आहे. एवढंच नाही तर, फरार आरोपी शुभम लोणकरच्या सातत्याने संपर्कात असल्याचंही समोर आलं आहे. आरोपी शुभम लोणकर हा आरोपींना संपर्क करण्यासाठी सिग्नल या ऍपचा वापर केल्याचंही समोर आलं आहे.

याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा लॉरेन्स बिश्नोईचा जबाब नोंदवण्याची शक्यता. रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी गुजरातच्या साबरमती जेलमध्ये जाऊन लॉरेन्सचा जबाब नोंदवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही कायदेशीर अडचणींमुळे लॉरेन्स बिश्नोईची पोलीस कोठडी मिळवण्यात अडचणी येत आहेत.

आधी अभिनेता सलमान खान नंतर बाबा सिद्दीकी आणि आता रोहित शेट्टीच्या घरावरही गोळीबार करण्यात आला. हे सगळे गुन्हे बिश्नोई गँगने केल्याचं देखील समोर आलं आहे. रोहित शेट्टी प्रकरणातही गुन्हे शाखेचे अधिकारी कोर्टाच्या परवानगीनुसार लॉरेन्सची चौकशी करण्याची शक्यता आहे.

शुभम लोंकर आरजू बिश्नोई याने स्वीकारली घटनेची जबाबदारी..

सोशल मीडियावर पोस्ट करत शुभम म्हणाला, ‘आज मुंबईमध्ये (शेट्टी टॉवर) सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाला, त्याची जबाबदारी शुभम लोंकर आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर हरमन संधू घेत आहे. आम्ही त्याला (रोहित शेट्टी) अनेकदा मेसेज केले की, आमच्या कामामध्ये येवू नकोस… पण त्याला कळलं नाही… आता त्याला हे कळंल नाही तर, पुढे त्याच्या घरावर नाही तर, बेडरुममध्ये गोळीबार करु… ही संपूर्ण बॉलिवूडला चेतावनी आहे…’’

Follow Us