जावयाला साडीत पाहून सासूबाई थेट… सचिन पिळगावकरांनी भर मंचावर सांगितलेला ‘अशी ही बनवाबनवी’चा किस्सा, ऐकताच माधुरी दीक्षित….
अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी 'कोण होणार करोडपती' या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी अशी ही बनवाबनवीमधील एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून अभिनेत्री माधुरी दिक्षीत खदाखदा हसली.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना केवळ ज्ञानच नाही, तर रंजक गप्पांचा देखील आनंद घेता येत आहे. या कार्यक्रमाची सूत्रसंचालक माधुरी दीक्षित यांनी सचिन पिळगावकर यांना अशी ही बनवाबनवी चित्रपाटाबद्दल रंजक माहिती सांगितली.
‘कोण होणार करोडपती’च्या आगामी विशेष भागात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले हजेरी लावणार आहेत.
या भागात सचिन पिळगावकर यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकांच्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच, त्यांच्या कौटुंबिक जीवनातील गमतीशीर किस्सेही ऐकायला मिळणार आहेत. गप्पांची ही रंगत वाढवण्यासाठी माधुरीने सचिन पिळगावकरांना अशी ही बनवाबनवीमधील गंमती जंमती विचारल्या तेव्हा सचिन पिळगावकरांनी त्यांच्या साडीतील किस्सा सांगितला.
या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी साडी नेसली होती हे सगळ्यांनाच माहित आहे. अशात अचानक सेट वर त्यांच्या सासुबाई आल्या. अशावेळी सचिन पिळगावकरांच्या पत्नी आईच्या पाया पडल्या हे पाहून सचिन पिळगावकरही पुढे सरावले इतक्यात सासूबाई म्हणाल्या ही बाई कोण?
मग सचिन पिळगावकर हसत हसत म्हणाले मी आहे ओळखलं नाही का सासूबाई तेव्हा त्या दचकल्या, पिळगावकरांनी हा किस्सा सांगिताच माधुरी दिक्षीत हसू लागल्या.