Nana Patekar : नाना पाटेकर यांनी माझ्या आईला फोन केला अन्… सचिन पिळगावकर यांनी सांगितला मोठा किस्सा..
Sachin Pilgaonkar on Nana Patekar : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. नानांच्या निधनानंतर कोणालाही विश्वास बसला नाही की, त्यांनी जगाचा निरोप घेतला.

गोव्यातील घरी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. 75 व्या वर्षी नानांनी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने 8 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांच्या जाण्याने मोठी शोककळा पसरली. कोणालाही विश्वासच बसला नाही की, नाना पाटेकर यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांचा जबरदस्त फिटनेस होता. ते दररोज सकाळी उठून व्यायाम करत. नाना पाटेकर यांनी अस्वस्थ वाटत असल्याच्या मेसेज डॉक्टरांना टाकला होता. पण ते तिथे पोहोचूपर्यंत उशीरा झाला. 45 मिनिट डॉक्टरांनी नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. आता नुकताच अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणीला उजाळा दिला.
रिडीओ सिटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते जुना किस्सा सांगताना दिसले. सचिन पिळगावकर यांनी म्हटले की, तो माझा खूप जास्त चांगला मित्र होता. कोणत्याही चित्रपटात आम्ही एकत्र काम केले नाही. तो मला कायमच फोन करायचा. त्याने ज्यावेळी मला फोन केला, त्यावेळी मी त्याला म्हणायचो की, मी देखील तुला आठवण करतो पण फोन तूच करतो. त्यावर नाना म्हणायचे की, त्यात काय फोन तू केला काय आणि मी केला, एकच आहे.
मला अजूनही एक गोष्ट आठवते. एकदा नानांनी माझ्या घरी फोन केला. त्यावेळी आईने फोन उचलला आणि सांगितले की, मी घरी नाही. त्यावर नाना पाटेकर आईला म्हणाले की, मी तुलाच बोलण्यासाठी फोन केला आई. तू कशी आहेस बरी आहे ना? तुला काही हवं असेल तर मला सांग… सचिन कामात व्यस्त असतो. माझी आई म्हणाली की, हो मी नक्की सांगेल.
नाना म्हणाले की, माझा नंबर लिहू घे… त्यावेळी मोबाईल नसलाचे. मला आईने हे सांगितले, त्यानंतर मी फोन लावून नानांचे आभार मानले. कारण माझ्या आईची ते त्यांच्या आईसारखे काळजी घेत होते. नानांची ही काळजी खरोखरच आपल्या स्वत: च्या आईसारखी होती.