Arbaz Shaikh On Tukaram Mundhe: रुग्णालयात होणारी लूट, तक्रारींवर तात्काळ कारवाई करणारे तुकाराम मुंढे, ‘सैराट’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Arbaz Shaikh On Tukaram Mundhe : रुग्णालयात होणारी लूट पाहता तुकाराम मुंढे यांनी तात्काळ कारवाई केली. यावर 'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेख याने मुंढे यांचे आभार व्यक्त केले. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशस मीडियावर व्हायरल होत आहे.

Arbaz Shaikh On Tukaram Mundhe: रुग्णालयात होणारी लूट, तक्रारींवर तात्काळ कारवाई करणारे तुकाराम मुंढे, सैराट फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
Tukaram Mundhe
| Updated on: Sep 18, 2026 | 3:40 PM

Arbaz Shaikh On Tukaram Mundhe: महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आपल्या समोर होणारे गैरप्रकार पाहून सोशल मीडियावर नेटकरी तुकाराम मुंढे यांना टॅग करत आहेत. ज्यावर तुकाराम मुंढे देखील त्वरित कारवाई करताना दिसत आहेत. ज्यामुळे सर्वच स्तरातून मुंढे यांचे कौतुक होत आहे. आता सैराट सिनेमातील ल्याची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली. पोस्ट शेअर करत त्याने तुकाराम मुंढे यांचे आभार मानले आहेत.

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अरबाज याच्या वडिलांचं निधन झालं. पण वडिलांवर उपचार सुरु असाताना अरबाज याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि सांगितलं रुग्णालयाकडून पैशांची लूट सुरु आहे. अभिनेत्यांच्या पोस्टनंतर अनेकांनी मदतीचा हात देखील पुढे केला.

आता अरबाज सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणतोय, ‘तुकाराम मुंढे साहेब तुमचे खूप खूप आभार.. याआधी देखील हॉस्पिटल बाबतीत अनेकांनी तक्रारी केल्या आहे. पण त्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली. मेडिकल सेक्टरमध्ये काही ठिकाणी होणाऱ्या लुटीबद्दल आपण अनेकदा बोलतो. पण यामध्ये रुग्णालयाचा देखील सहभाह आहे का? याचा तपास होणं फार गरजेचं आहे… डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टर कडे पेशंट रेफर केल्यावर कमिशन मिळत असल्याचे आरोप, ॲम्बुलन्स चे पैसे , सिटीस्कॅन रेफर मधील कथित कमिशन या सर्व गोष्टींची पारदर्शक चौकशी होण्याची गरज आहे.’

अभिनेता पुढे म्हणाला, ‘माझ्या कुटुंबावर असा प्रसंग ओढावला तेव्हा तुम्ही माझी मदत केली. त्यावेळी तुम्ही कारवाई केली. म्हणून वैयक्तिकरित्या तुमचा आभारी आहे. महाराष्ट्राला तुमच्यासारख्या प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची खूप गरज आहे. थँक्यू सो मच तुकाराम मुंढे साहेब.’, सध्या अरबाज याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पोस्ट करत अरबाज कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘“रुग्ण हा ग्राहक नाही… तो एक माणूस आहे. सगळेच डॉक्टर किंवा हॉस्पिटल्स असे नाहीत. आजही अनेक डॉक्टर आणि हॉस्पिटल्स प्रामाणिकपणे, माणुसकीने आणि सेवाभावाने काम करत आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात पूर्ण आदर आहे. ही लढाई प्रामाणिक डॉक्टरांविरोधात नाही…’, पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कारवाई देखील केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us