प्रसिद्ध अभिनेत्रीचा अश्लील MMS, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाली, ‘डाऊलनलोड करु नका अन्…’

सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर अभिनेत्रीने संताप व्यक्त करत नेटकऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, व्हिडीओ कोणाला सेंड करू नका आणि डाऊनलोड देखील करु नका... नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या..

प्रसिद्ध अभिनेत्रीचा अश्लील MMS, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाली, डाऊलनलोड करु नका अन्...
| Updated on: Sep 01, 2026 | 12:19 PM

Shalini pandey Deepfake video: ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘महाराज’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री शालिनीा पांडे हिचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेट तिच्या नावाने एका आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर शालिनी हिने मौन सोडलं असून, व्हायर होणारा व्हिडीओ खोटा आणि एआय जनरेटेड आहे. सांगायचं झालं तर, फक्त शालिनीच नाही, तर याआधी देखील अनेक अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आता शालिनी हिच्या व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

 

डिजिटल तंत्रज्ञानाचा वाईट वापर…

शालिनी हिने एक अधिकृत वक्तव्य जारी करत व्हिडीओ पूर्णपणे खोटा असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणते, ‘हे पाहिल्यानंतर प्रचंड दुःख होतं आणि राग देखील येतो. कारण तंत्रज्ञानाचा वापर वाईट मार्गाने होत आहे… कोणत्या महिलेची प्रतिभा आणि गोपनियतेवर हल्ला करणं फार वाईट आहे.. हा व्हिडीओ पूर्णपणे डीपफेक आहे. AI च्या मदतीने व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. मी माझ्या चाहत्यांनी एक विनती करतेय की, कोणतीही वाईट गोष्ट शेअर करु नका… डाऊनलोड करुन पुढे कोणाला जेऊ नका. ‘

ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या स्वतःच्या ‘डीपफेक’ (deepfake) व्हिडिओबाबत शालिनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्पष्ट केलं आहे की, ऑनलाइन फिरणारा हा एआय-निर्मित (AI-generated) व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे आणि त्यात दिसणारी महिला ती स्वतः नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना, आणि विशेषतः महिलांना लक्ष्य केलं जाणं व त्यांना हानी पोहोचवली जाणं ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे शालिनीने म्हटलं आहे.

सांगायचं झालं तर ही पहिलीच वेळ नाही जेव्हा अभिनेत्रीचे डीफ फेक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहे. याआधी देखील अभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेत्री आलिया भट्ट यांचे देखील व्हिडीओ व्हायरल झालेले. ज्यावर अन्य सेलिब्रिटींनी देखील संताप व्यक्त केलेला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us