नुकतंच भाजप सोडून गेलेल्या बड्या नेत्याला मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्रीने वाचवलं, नेमकं प्रकरण काय?
भारतीय जनता पक्षाचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला आणि अभिनेत्री स्वरा भास्कर 'राईज अँड फॉल'च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले आहेत. या शोमध्ये सिवेत तोमर आणि शहजाद पूनावालाचे काही कारणामुळे वाजले, ते कारण काय ते जाणून घ्या...

भारतीय जनता पक्षाचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला आणि अभिनेत्री स्वरा भास्कर ‘राईज अँड फॉल’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले आहेत. या पर्वाची सुरुवात दणक्यात झाली. शहजाद पूनावाला आणि अभिनेता सिवेत तोमर यांच्यात वाद झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. मात्र, परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून स्वरा आणि इतर स्पर्धकांनी हस्तक्षेप केला.
नेमकं काय घडलं?
शहजाद सतत स्वरा भास्कर आणि सिवेत तोमर यांना लक्ष्य करत होता. तो म्हणाला, “त्या सिवेतचा कणा बघा! स्वरा भास्करसोबत बसलेला मला लेक्चर देतोय. दादा, हा ढोंगीपणा आहे. जा रे दादा, युती कर. ही युती आहे! सिवेतचा टॅटू घेऊन फिरणारा स्वरा भास्करसोबत बसला आहे.” शहजाद असे ओरडत असताना स्वराने हस्तक्षेप केला.
शहजादचे शब्द ऐकून सिवेत तोमरचा संताप अनावर झाला. तो पटकन शहजादच्या दिशेने गेला, पण स्वराने त्याला थांबवले आणि मारू नकोस असे सांगितले. दरम्यान, सिवेतची शहजाद पूनावालासोबत झटापट सुरू झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून इतर स्पर्धक मध्यस्थी करण्यासाठी धावून आले. शहजाद पूनावाला आधीच खाली पडला होता. तोमर एवढ्यावरच थांबला नाही; लोकांनी त्याला बाजूला खेचताच त्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, शहजादनेच सिवेतला चिथावले आणि त्यामुळेच प्रकरण चिघळले, असे आरोप केले जात आहेत.
या घटनेनंतर, पूनावालाने कॅमेऱ्यासमोर आपला फाटलेला कुर्ता दाखवताना दिसला, ज्यामुळे शोमध्ये झालेल्या वाद आणखी चिघळला. काही वृत्तांनुसार, शहजाद पूनावालासोबत झालेल्या शारीरिक झटापटीच्या घटनेनंतर सिवेत तोमरला शोमधून काढून टाकण्यात आले आहे. याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या झटापटीनंतर पूनावालाच्या टीमने एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लिहिलं गेले की, ” शहजादने लहानपणीच आपले वडील गमावले आणि आता त्याची आई वृद्ध होत आहे. वैचारिक मतभेदांमुळे त्याचे त्याच्या भावासोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. शहजाद आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमवायला गेला आहे, परंतु त्याला पाठीमागून शाब्दिक शिवीगाळ आणि शारीरिक हल्ल्याला सामोरे जावे लागले.”