
Zubeen Garg: प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक झुबिन गर्ग याचं अचानक निधन झालं आहे. ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. तर गायकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबिन गर्गचा मृत्यू झाला. झुबिनने लाईफ जॅकेटशिवाय समुद्रात उडी मारल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ झुबिन गर्गच्या मृत्यूच्या काही क्षण आधी काढण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे.
गायक समुद्रात बुडत आहे पाहताच पोलिसांनी गायकाला बाहेर काढलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. झुबिन याचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. गायकाचा शेवटचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना व्हिडीओवर कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
आता, झुबिन गर्ग समुद्रात उडी मारतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाण्यात मजा करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरचा दावा आहे की झुबिनने सुरुवातीला लाईफ जॅकेट घालून उडी मारली. त्यानंतर तो 1.26 सेकंदात यॉटवर परतला आणि लाईफ जॅकेटशिवाय पुन्हा उडी मारली. पण यावेळी तो जिवंत परत येऊ शकला नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचे मन दुखावलं आहे.
Last video of Zubeen. I too am a man broken with grief, just like you. He jumped with a life jacket on. After 1.26 seconds he returned to yacht, took off his life jacket & jumped again. This time, he came back lifeless.#zubeen#Zubeen_Garg #ZubeenGargDeath #zubeengargaccident pic.twitter.com/yttAESC8ey
— Nandan Pratim Sharma Bordoloi (@NANDANPRATIM) September 19, 2025
झुबिन गर्ग याची पत्नी गरिमा सैकिया गर्ग हिला देखील असह्य दुःख झालं आहे. गायकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकाच्या पत्नीचा फोटो देखील समोर आला आहे. ज्यामध्ये तिची रडून – रडून वाईट अवस्था झाल्याचं समोर येत आहे.
गरिमा सैकिया ही एक प्रसिद्ध आसामी पोशाख डिझायनर, सिनेमा निर्माती आणि सर्जनशील व्यावसायिक आहे. तिने आसामी आणि प्रादेशिक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.