सुमन कल्याणपूर यांचं हे गाणं 7 वर्षे झालं रिजेक्ट, रिलीज होताच बनलं ब्लॉकबस्टर; आजही थिरकतात लोक
Suman Kalyanpur Hit Song : सुमन कल्याणपूर यांचं असं एक गाणं आहे जे सुरुवातीला नाकारण्यात आलं होतं, मात्र नंतर ते सुपरहिट ठरले. आजही हे गाणं लागलं की सगळेच थिरकतात. या गाण्याबाबत माहिती जाणून घेऊयात.

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या ब्लॉकबस्टर गाण्यांची चर्चा इंटरनेटवर सुरू झाली आहे. सुमन कल्याणपूर यांचं असं एक गाणं आहे जे सुरुवातीला नाकारण्यात आलं होतं, मात्र नंतर ते सुपरहिट ठरले. मोठमोठ्या स्टार्सनी हे गाण आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिला. सुमन कल्याणपूर यांच्यासह हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलेले आहे. त्या काळात रफी गाणी रिलीज होताच सुपरहिट मानली जात होती. तरीही हे गाणं सलग 7 वर्षे रिजेक्ट होत राहिलं आणि अखेर रिलीज होताच चार्टबस्टर बनलं. या गाण्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोणतं आहे हे गाणं?
सुमन कल्याणपूर यांच्या या गाण्याचे नाव ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ असं आहे. या गाण्याच्या रिजेक्शनची सुरुवात 1961 मध्ये झाली. त्यावेळी ‘जब प्यार किसी से होता है’ हा चित्रपट बनत होता. यात देव आनंद, आशा पारेख आणि प्राण असे दिग्गज कलाकार काम करत होते. शंकर जयकिशन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं. त्याचदरम्यान हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. गीतकार हसरत जयपुपी यांनी त्याचे बोल लिहिले होते. मात्र देव आनंद यांना हे गाणं खूप लाउड वाटलं आणि त्यांनी ते चित्रपटातून काढून टाकायला सांगितलं.
दुसऱ्यांदा मिळाला नकार
हे गाणं रिजेक्ट झाल्यानंतरही शंकर जयकिशन यांनी हार मानली नाही. जवळपास 5 वर्षांनी, 1966 मध्ये सुरज हा चित्रपट तयार होत होता. यात राजेंद्र कुमार मुख्य भूमिकेत होते. संगीत तयार करताना शंकर यांना ही जुनी धून आठवली आणि त्यांनी ती पुन्हा ऐकवली. त्यांना वाटलं की यावेळी गाणं स्वीकारलं जाईल. पण पुन्हा नकार मिळाला. अशा प्रकारे दुसऱ्यांदाही हे गाणं रिजेक्ट झालं.
शम्मी कपूर यांची गाण्याला पसंती
1968 मध्ये ब्रम्हचारी हा चित्रपट बनत होता. या चित्रपटात शम्मी कपूर मुख्य भूमिकेत होते. जेव्हा शंकर जयकिशन यांनी त्यांना ही धून ऐकवली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती. शम्मी कपूर यांना हे गाणं पहिल्याच वेळी आवडलं. त्यांनी तात्काळ सांगितलं की हे गाणं त्यांच्या चित्रपटात असायलाच हवं. त्यानंतर हे गाणं चित्रित करण्यात आलं आणि रिलीज होताच लोकांच्या ओठांवर चढलं.
आजही थिरकतात लोक
आजही पार्ट्या, स्टेज शो आणि लग्नसमारंभांमध्ये आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हे गाणं तितक्याच उत्साहाने वाजवलं जातं. नवीन पिढीलाही हे गाणं तेवढंच आवडतं. जवळपास 65 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. आजही अनेकजण या गाण्यावर थिरकताना दिसतात.