Govinda Affair : गोविंदाचं खरंच अभिनेत्रीसोबत होतं अफेअर? बायको म्हणाली, तिने फक्त पैशांसाठी…

Govinda Affair : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे... गोविंदा याचे परक्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं... पण आता अखेर सुनीता हिने सत्य समोर आणलं आहे.

Govinda Affair : गोविंदाचं खरंच अभिनेत्रीसोबत होतं अफेअर? बायको म्हणाली, तिने फक्त पैशांसाठी...
अभिनेता गोविंदा
| Updated on: Dec 25, 2025 | 10:08 AM

Govinda Affair : 2025 मध्ये अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या. अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेत लग्नाचा अंत केला. दरम्यान अभिनेता गोविंदा आणि पत्नी सनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता… पण प्रत्येक वेळेस सुनीता हिने अफवा असल्याचं सांगत, सर्व चर्चा फेटाळून लावल्या… पण आता सुनीता हिने गोविंदा याच्या अफेअरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय त्या मुलीबद्दल सांगितलं जिच्यासोबत गोविंदा याचे प्रेमसंबंध होते. त्या मुलीचं गोविंदा याच्यावर प्रेम नव्हतं. फक्त पैशांसाठी सर्वकाही सुरु होतं… असं देखील सुनीता म्हणाली.

सुनीता आहुजा आणि गोविंदा यांच्यासाठी 2025 हे वर्ष फार कठीण होतं. 2024 मध्ये गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाची चर्चा देखील रंगली. पण, गणेश उत्सवादरम्यान दोघे पुन्हा एकत्र आले आणि घटस्फोटाच्या अफवांना नकार दिला. तथापि, गोविंदाचं एका तरुण मराठी अभिनेत्रीसोबतच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत राहिल्या. दरम्यान, सुनीता आहुजा हिने स्पष्ट केले आहे की, तिचा पती गोविंदा ज्या मुलीला डेट करत आहे ती अभिनेत्री नाही.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुनीता म्हणाली, ‘2025 हे वर्ष वाईट होतं असं मी मानते… कारण मी गोविंदाच्या वादांबद्दल ऐकत होते की त्याचं एखाद्या मुलीशी प्रेमसंबंध आहे. पण मला माहिती आहे की की कोणतीच अभिनेत्री नाव्हती कारण, अभिनेत्री असं काम कधीच करत नाहीत. तिचं गोविंदावर प्रेम नव्हतं… तिला फक्त त्याचा पेसा हवा होता…

पुढे सुनीता म्हणाली, ‘2026 मध्ये मला सर्वकाही संपवायचं आहे… मला असं वाटतं की गोविंदाने सर्व वाद संपवले पाहिजे आणि 2026 मध्ये मला आनंदी कुटुंब हवं आहे आणि मला अपेक्षा आहे हे 2026 मध्ये होईल. मला आशा आहे की गोविंदाला हे समजलं असेल की त्याच्या आयुष्यातील तीन सर्वात महत्वाच्या महिला म्हणजे त्याची आई, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी. ‘

‘कोणालाही आयुष्यात चौथी स्त्री असण्याचा अधिकार नाही. हे जगातील प्रत्येक पुरूषाला लागू होतं, अगदी गोविंदालाही. मला वाटतं की गोविंदाने नकोत्या गोष्टींकडे लक्ष न देता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे… असं देखील सुनीता म्हणाली.