‘या’ अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप, थेट अभिनेत्रीचा मृतदेह सापडला या अवस्थेत, मोठी खळबळ

नुकताच या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतलाय. अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वजण हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरूवात केलीये. काही मोठे खुलासे होण्याची देखील शक्यता आहे. पोलिस या प्रकरणात मोठे खुलासे करू शकतात.

या अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप, थेट अभिनेत्रीचा मृतदेह सापडला या अवस्थेत, मोठी खळबळ
| Updated on: Feb 13, 2024 | 2:39 PM

मुंबई : नुकताच एक धक्कादायक आणि हैराण करणारा प्रकार घडलाय. एक प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतलाय. यानंतर सर्वचजण हैराण झाले आहेत. हेच नाही तर अभिनेत्रीच्या निधनानंतर चाहतेही हैराण झालेत. अभिनेत्री विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत हिचे निधन झालंय. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे कळतंय. हेच नाही तर अभिनेत्रीने तिच्या राहत्याघरी आत्महत्या केलीये. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

अभिनेत्रीच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जातंय. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मल्लिकाचा मृतदेह ताब्यात घेतलाय. अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्याची देखील माहिती मिळतंय. पोलिसांनी अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर आता तपास सुरू केलाय. याप्रकरणात मोठे खुलासे हे होऊ शकतात.

अभिनेत्रीने आत्महत्या करण्यासाठी पाऊल नेमके का उचलले यावर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर या प्रकरणात आता काही मोठे आणि हैराण करणारे खुलासे देखील होऊ शकतात. हेच नाही तर अभिनेत्री मल्लिका राजपूत हिने बाॅलिवूडच्या एका चित्रपटात कंगना राणावत हिच्यासोबत देखील काम केले.

अभिनेत्रीचे अनेक म्यूजिक एल्बम देखील आहेत. हेच नाही तर मल्लिका राजपूत हिने एका राजकिय पक्षात देखील प्रवेश केला होता. मात्र, राजकारणात म्हणावे तसे यश तिला मिळाले नाही. अभिनेत्रीने राजकारण आणि अभिनय याच्यानंतर थेट गृस्थन संन्यास देखील घेतला होता.

अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर सर्वजण हैराण झाले आहेत. रिपोर्टनुसार अभिनेत्रीचा तिच्या परिवारासोबत वाद सुरू असल्याचे देखील सांगितले जाते. यानंतर थेट पोलिसांना देखील बोलवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हा वाद मिटवण्यात आला. आता पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणात तपास हा सुरू केलाय.