Top 10 Shows: 436 दिवसांपासून टॉपमध्ये हा कार्यक्रम, ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालाय प्रदर्शित

Top 10 Shows: एक शो गेल्या ४३६ दिवसांपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर टॉप १० मध्ये आहे. या शोला आयएमडीबी रेटिंग ६.५ आहे. जर तुम्ही हा शो पाहिला नसेल नक्की पाहा.

Top 10 Shows: 436 दिवसांपासून टॉपमध्ये हा कार्यक्रम, ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालाय प्रदर्शित
OTT Show
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 11:34 AM

ओटीटी जगात सतत काही ना काही नवा कंटेन्ट येत असतो. नेटफ्लिक्सच्या २७ सप्टेंबर २०२६ च्या टॉप १० यादीत एक अतिशय आश्चर्यकारक एंट्री दिसली. या यादीत असा एक शो दिसला जो गेल्या ४३६ दिवसांपासून टॉप १० ट्रेंडिंगमध्ये स्थान टिकवून आहे. फ्लिक्सपेट्रोलच्या यादीत टॉप १० टीव्ही शोमध्ये हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शोचे नाव तुम्हाला माहित आहे का? या शोतील प्रमुख नावे आहेत कपिल, सुनील, कृष्णा, अर्चना आणि किकू. आता तर तुम्हाला हिंट मिळाली असेलच. तरीही जर तुम्हाला ओळखता आले नसेल तर या शोचे नाव आहे ‘द ग्रेट इंडियन कपिल शो.’ सध्या या शोचा नेटफ्लिक्सवर पाचवा सीझन सुरू आहे.

३० मार्च २०२४ ते २७ सप्टेंबर २०२६ पर्यंतचा प्रवास

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा प्रीमियर ३० मार्च २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर झाला होता. रिलीज होताच त्याने चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले. कपिल शर्मा यांच्यासोबत सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, अर्चना पुरन सिंह आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्या जुन्या टीमने एअरपोर्ट कॅफे सेटवर तोच मजेदार माहोल पुन्हा निर्माण केला, जो पूर्वी टीव्हीवर लाखो कुटुंबांना जोडत असे. अनेक सीझन आणि स्पेशल एपिसोडनंतरही शोची लोकप्रियता कमी झाली नाही. पाचवा सीझन २६ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झाला आणि दुसऱ्याच दिवशी तो यादीत टॉपवर आला.

नेटफ्लिक्ससाठी ही कामगिरी विशेष आहे, कारण हा त्यांचा पहिला मोठा भारतीय ओरिजिनल कॉमेडी टॉक शो होता ज्याने ग्लोबल चार्ट्सवरही स्थान मिळवले. नंतरच्या सीझनमध्ये जागतिक प्रेक्षक संख्येत चढ-उतार झाले असले, तरी भारतात त्याची पकड कधी ढिली झाली नाही. २७ सप्टेंबरच्या यादीत हा नवीन शो ‘शक: ट्रस्ट नो वन’च्या अगदी मागे आहे, तरीही ४३६ दिवसांचा प्रवास सोपे नाही.

टॉप शोची यादी वाचा:

1. शक ट्रस्ट नो वन

2. द ग्रेट इंडियन कपिल शो

3. झाकिर खान पापा यार

4. चुम्बक

5. डब्ल्यूडब्ल्यूई स्मॅकडाउन

6. ऑपरेशन सफेद सागर द अनटोल्ड स्टोरी ऑफ द कारगिल वॉर

7. मुसाफिर कॅफे

8 इंडियाज गॉट लेटेंट

9. मॉन्स्ट्र द लिजी बॉर्डेन स्टोरी

10. द फाइनल प्रॉब्लम

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us