‘द ग्रेट खली’च्या कारला अपघात, व्हिडीओ समोर, सध्या प्रकृती कशी..
The Great Khali: द ग्रेट खली कुस्तीपटूच्या कारला अपघात झाला आहे. यामुळे कारचे नुकसान झाले आहे. हरियाणाच्या पानीपत येथे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. खली याने पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

‘द ग्रेट खली’ नावाने प्रसिद्ध असलेला डब्ल्यूडब्ल्यूई पहिलवान दिलीप सिंह हा रस्ते अपघातातून बालंबाल बचावला आहे. खली याच्या सुव्हची टोल प्लाझावर दुसऱ्या एका वाहनाशी टक्कर झाल्याचे म्हटले जात आहे. हा अपघात हरियाणाच्या पानीपत येथे घडला आहे. खली त्याच्या सुव्हमधून जात असताना टोल प्लाझाच्या जवळ खलीच्या कारची दुसऱ्या कारशी धडक झाल्याने ही घटना घडली. या अपघाताबद्दल खली याने आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरुन या अपघाताची बातमी शेअर केली आहे. त्यात त्याने त्यांच्या तब्येती विषयी माहिती दिली आहे.
खली याने व्हिडीओत म्हटलेय की काल माझ्या कारचा अपघात झाल्यानंतर माझे मित्र काळजी सापडले आहेत आणि मॅसेज करत आहेत. ते मला विचारत आहेत की मी ठीक आहे की नाही. मी सर्वांना सांगू इच्छित आहे की संपूर्णपणे ठीक आहे. तुम्हा लोकांचा आणि उपरवाल्याचा आशीवार्द आहे. माझी कार थोडी डॅमेज झाली आहे. मात्र, इतकी मोठी घटना नाही. खली याला वाटते की ही बातमी सोशल मीडियावर पसरु नये अशी त्याची इच्छा आहे. कारण इतकी काही गंभीर घटना नव्हती असे त्याचे मत आहे. कारण त्याच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही बातमी वाऱ्यासारखे पसरली आहे.
खली याने या अपघातानंतर पोस्ट करीत म्हटले
मी सर्वांचा आभारी आहे, सर्वांना धन्यवाद देतोय की तुम्ही माझी इतकी काळजी घेताय आणि तब्येची इतकी विचारपूस करताय. प्लीझ तुम्ही देखील आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, जय भारत ! असे खली याने या अपघातानंतर पोस्ट करीत म्हटले आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की डॅमेज झालेल्या कारमधून द ग्रेट खली बाहेर येताना आणि दुसऱ्या कारकडे जाताना दिसत आहेत. पानीपतच्या टोल प्लाझाजवळ हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. खली याला काही झालेले नाही. मात्र, त्याच्या कारची हालत आणि हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना काळजी लागली होती.
येथे पोस्ट वाचा…
The Great Khali was involved in a car accident today in India.
He left the scene without any injuries. pic.twitter.com/huTfVyVUrS
— FADE (@FadeAwayMedia) August 29, 2026
पंजाब पोलिस दलात नोकरी
‘द ग्रेट खली’ एक व्यावसायिक रेसलर असून बराच काळ खलीने WWE च्या रिंगणातही फ्रीस्टाईल कुस्ती केली आहे. भारतात जन्मलेले दिलीप सिंह उर्फ खली याचे वय ५४ असून त्याचे वजन १५७ किलो आहे. साल १९९३ मध्ये खलीने पंजाब पोलिस दलात नोकरी जॉईंट केली होती. त्याच्या उंची आणि रुंदीचा फायदा उचलत खलीने २००० मध्ये प्रोफेशनल रेसलिंग सुरु केली. त्यानंतर त्याने WWE रिंगणातही चाहत्यांना खूष केले. दिलीप सिंह याचे WWE मध्ये ‘द ग्रेट खली’ असे नामकरण झाले. त्यानंतर खली याच्या चाहत्यांची संख्या वाढली.