Guess Who : ओळखलंत का या चिमुरडीला? आमिर खानसोबत दिला 194 कोटींचा ब्लॉकबस्टर, कटरीना-दीपिकालाही दिली टक्कर; लग्नानंतर इंडस्ट्रीपासून दूर

फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी, मोठी झाल्यावर यशस्वी अभिनेत्री बनली, तिने अनेक हिट चित्रपट दिले. आमिर, सलमान आणि अक्षय कुमारची ती हिरॉईन होती. तुम्ही ओळखलं का तिला ?

Guess Who : ओळखलंत का या चिमुरडीला? आमिर खानसोबत दिला 194 कोटींचा ब्लॉकबस्टर, कटरीना-दीपिकालाही दिली टक्कर; लग्नानंतर इंडस्ट्रीपासून दूर
Image Credit source: social media
| Updated on: Oct 24, 2026 | 7:49 PM

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण केलं, एक ओळख मिळवली. वरच्या फोटोत दिसणारी ही लहान मुलगी, मोठी झाल्यावर यशस्वी अभिनेत्री बनली. सलमान , आमिर खान आणि अक्षय कुमारसोबत काम करत तिने अनेक हिट चित्रपट दिले. अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अशी ती अभिनेत्री आहे. विशेषत: आमिर खानसाठी ती अतिशय लकी ठरली. ज्या काळात 100 कोटींच्या क्लबमध्ये नावाचा समावेश होणं हे एखाद्या फिल्मसाठी अतिशय मोठी गोष्ट होती. त्याच काळात या अभिनेत्रीने आमिर खानसोबत काम करत 194 कोटींचा गल्ला जमवला. एवढंच नव्हे तर तिने साऊथमध्येही अनेक हिट चित्रपट दिले. मात्र काही काळाने या अभिनेत्रीने एक प्रसिद्ध उद्योगपतीशी लग्न केलं आणि फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. मात्र अनेक हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीपद्दल, तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते आजही उत्सुक असता.

कोण आहे ही अभिनेत्री ?

Loading...

तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलंत का ? जर तुम्ही अजून हिला ओळखू शकला नसाल, तर चला तिचं नाव जाणून घेऊया.. ही अभिनेत्री म्हणजे असिन (south actress Asin). तिच्याच लहानपणीचा हा फोटो आहे. असिनने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ इंडिय चित्रपटसृष्टीतून केली आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने आमिर खान, सलमान खान यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

असिनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर 26 ऑक्टोबर 1985 रोजी केरळमधील कोची येथे एका कॅथलिक कुटुंबात तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांचं नाव जोसेफ थोट्टूमकल असून ते मूळचे थोडुपुझा येथील आहेत. ते एक प्रसिद्ध व्यावसायिक होते. मात्र, मुलीच्या अभिनय कारकिर्दीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी स्वतःचा व्यवसाय बंद करून तिच्या करिअरकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. असिनने 2001 मध्ये ‘नरेंद्रन माखन जयकांतन वाका’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘अम्मा नन्ना ओ तमिळ अम्मायी’ आणि तमिळमधील ‘गजनी’ यांसारख्या चित्रपटांमुळे तिला दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळाली.

गजनीमुळे झाली लोकप्रिय

यानंतर असिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा तिचा पहिलाच हिंदी चित्रपट होता आणि त्यातूनच ती रातोरात लोकप्रिय झाली. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीचा (Best Female Debut) फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. 2016 साली असिनने मायक्रोमॅक्स कंपनीचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आणि कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य दिलं. असिन आणि राहुल यांना अरिन नावाची एक मुलगी आहे.

‘गजनी’ हा चित्रपट तिच्या करिअरसाठी खूप महत्वाचा ठरला. या फिल्ममुळे तिचा करिअर ग्राफ एकदम वर गेला. त्यानतंर असिन अनेक चित्रपटात तिने मुख्य भूमिका केल्या, ज्यामध्ये गजनी, रेडी, बोल बच्चन, ऑल इज वेल अशा चित्रपटांचा समावेश होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us