Tiger Shroff : गोळीबारानंतरच का ट्रेंड होतंय टायगर श्रॉफचं खरं नाव? ‘ती’ एक सवय ज्यामुळे…

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या टायगर यांचं खरं नाव देखील आता ट्रेंड होत आहे. अभिनेत्याचं खरं नाव फार कोणाला माहिती नाही. पण अभिनेत्याच्या एका सवयीमुळे त्याचं नाव टायगर असं पडलं.

Tiger Shroff : गोळीबारानंतरच का ट्रेंड होतंय टायगर श्रॉफचं खरं नाव? ती एक सवय ज्यामुळे...
Tiger Shroff
| Updated on: Oct 20, 2026 | 1:08 PM

Tiger Shroff : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता टायगर श्रॉफ काही दिवसांपासून चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्यावर गोळीबार करण्यात आला. पण सुदैवाने अभिनेत्याला काहीही झालं. टायगर जखमी आहे, पण सुरक्षित आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण चर्चेत असताना अभिनेत्याचं खरं नाव ट्रेंड होत आहे. टायगर याचं खरं नाव कोणाला माहिती नाही. फार कमी लोकांना त्यांचं नाव माहिती आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याच्या एक सवयीमुळे त्याचं नाव टायगर असं पडलं… टायगर या नावाची देखील एक खास कहाणी आहे. जी ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल…

सांगायचं झालं तर, टायगर श्रॉफ याचं खरं नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे. अभिनेत्याचं नाव जय हेमंत श्रॉफ असं असलं तरी त्याला टायगर म्हणूनच ओळखतात. अनेकांना माहिती देखील नाही टायगर याचं खरं नाव काय आहे आणि त्याच्या नावा मागची कहाणी काय आहे. याबद्दल स्वतः टायगर याने सांगितलं होतं. अभिनेत्यांने सांगितल्यानुसार, लहानपणी त्याला चावण्याची सवय होती. जेव्हा अभिनेता कोणाला भेटायचा कोणी त्याला प्रेमात जवळ घेतलं तरी, टायगर त्याला चावायचा… त्यानंतर कुटुंबियांनी त्याचं नाव टायगर श्रॉफ असं ठेवलं.

Loading...

सांगायचं झालं तर, टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध स्टार राहिलेले आहेत. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून टायगर श्रॉफने 2014 मध्ये ‘हिरोपंती’ सिनेमातून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं. कृती सेननसोबत त्याने या सिनेमात रोमान्स केला होता. लोकांना हा सिनेमा खूप आवडला होता. यानंतर त्याने ‘बागी’, ‘ए फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’ आणि ‘वॉर’ यांसारख्या अनेक सिनेमांमधील आपल्या भूमिकांनी चाहत्यांची मनं जिंकली आणि तो इंडस्ट्रीत पुढे जात राहिला.

विशेष म्हणजे, काल टायगर श्रॉफवर झालेल्या हल्यानंतर बॉलिवूडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रविवारी रात्री मुंबईच्या जुहू भागात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. तेव्हापासून आतापर्यंत चाहते टायगर श्रॉफबद्दल चिंतेत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत कोटा येथेच ठेवलं आहे. कोटा येथील रेल्वे कॉलोनी पोलीस स्टेशन येथे तिन्ही आरोपींना ठेवण्यात आलं आहे. आज रस्ते मार्गाने आरोपींना मुंबई आणणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. तर पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us