श्रुती मराठेला विद्याधर जोशींचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, मला वाजवणं आवडेल, वाजवणाऱ्याला त्रास न होता..

Vidyadhar Joshi On Shruti Marathe : विद्याधर जोशी यांनी कलाकारांच्या वादनावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर अभिनेत्री श्रुती मराठेनं उत्तर दिलेलं. मात्र, आता विद्याधर जोशी यांनी पुन्हा श्रुतीच्या कमेंटवर प्रत्युत्तर दिलं आहे.

श्रुती मराठेला विद्याधर जोशींचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, मला वाजवणं आवडेल, वाजवणाऱ्याला त्रास न होता..
Vidyadhar Joshi and Shruti Marathe
| Updated on: Sep 28, 2026 | 6:32 PM

मराठी कलाकारांनी एकत्र येऊन २०१४ मध्ये कलावंत ढोल ताशा पथकाची स्थापना केली. अनेक कलाकार या ढोल ताशा पथकात सहभागी झाले असून श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले यांसारख्या कलाकारांचे ढोल-ताशा वादनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यंदाच्या गणेशोत्सवातही कलाकारांच्या वादनाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. यावर ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी पोस्ट शेअर केलेली. या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या होत्या. मात्र, अभिनेत्री श्रुती मराठेच्या कमेंटनं चाहत्यांचं लक्ष वेधलं. यावरही कमेंट करत विद्याधर जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय होती विद्याधर जोशींची पोस्ट?
विद्याधर जोशी यांनी पोस्ट करत लिहिलं की, ‘एक आपली उत्सुकता…1.हे पुण्यातल्या कलाकार पथकातले कलाकार विसर्जनाच्या मिरवणुकीत एकूण किती वेळ ‘ वादन ‘ करतात?? 2. ज्या जोशाने ते रिल्स मधे वाजवताना दिसतात तितक्याच जोशात ते सतत ‘ वादन ‘ करतात का?’

Loading...

विद्याधर यांच्या कमेंटवर श्रुती मराठेनं रिप्लाय करत लिहिलं की, ‘बाप्पा…दीड महिना सराव, ११ दिवसांत १४ वेळा वादन आणि शेवटच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची विसर्जन मिरवणूक एवढं आम्ही करतो. कारण, आम्हाला वादन करायला मनापासून आवडतं. बाकी आमच्या वादनाची शंका असेल, तर पुढच्या वर्षी जरुर या एक दिवस तरी बघायला. तुमचे सगळे प्रश्न सुटतील. घरी बसून फेसबूकवर टाकून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत बाप्पा. जे लोक आम्हाला लाइव्ह बघतात ते असे प्रश्न फेसबूकवर टाकत नाहीत.’

विद्याधर जोशींची प्रतिक्रिया
श्रुतीच्या या कमेंटवर विद्याधर जोशींनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘श्रुती तुझ्या पहिल्या तीन ओळीत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं धन्यवाद. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. प्रत्यक्ष येऊन बघायची काहीही गरज नाही आणि तसेही मला येऊन बघण्यापेक्षा कदाचित वाजवणं आवडेल. कारण वाजवणाऱ्याला त्रास होत नाही. बघणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला तो जास्त होतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुला किंवा इतरांना फक्त रील मध्ये बघितल्यामुळे प्रश्न पडले. प्रत्यक्ष बघितलं नाही हे खरंच आहे. पण एफबीवरती प्रश्न विचारून तू माझ्या प्रश्नाला उत्तर दिलंस, याबद्दल तुझे शतशः आभार. तुला माझा राग आला असेल तर ते योग्यच आहे.’ असं विद्याधर जोशी यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us