Rashmika Vijay Wedding: रश्मिकाला मंगळसूत्र घालताना घाबरत होता विजय; म्हणालेला , ‘माला भीती वाटत होती, पण ती…’

Rashmika Vijay Wedding: मंडप सजलेलं... पाहुणीमंडळी जमलेली... पण रश्मिकाला मंगळसूत्र घालताना घाबरलेला विजय देवरकोंडा..., म्हणालेला, 'मला भीती वाटत होती, पण ती तर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका - विजय यांच्या नात्याची चर्चा

Rashmika Vijay Wedding: रश्मिकाला मंगळसूत्र घालताना घाबरत होता विजय; म्हणालेला , माला भीती वाटत होती, पण ती...
Rashmika Vijay Wedding
| Updated on: Feb 27, 2026 | 12:46 PM

Rashmika mandanna – Vijay deverakonda: अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी मोठ्या शाही थाटात लग्न केलं. 26 फेब्रुवारी 2026 मध्ये दोघांनी उदयपूर याठिकाणी लग्न केलं. पारंपरिक रितेने दोघे लग्नबंधनात अडकले. सांगायचं झालं तर, गेल्या सात वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांनी त्यांच्या नात्याचा कधीच सर्वाच सरमोर स्वीकार केला नाही. पण लग्नाच्या दोन दिवस आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांना लग्नाची बातमी जाहिर केली आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे. ही पहिली वेळ नाही, जेव्हा रश्मिका आणि विजय विवाबबंधनात अडकले आहेत. दोघांची पहिली भेट 2018 मध्ये झाली होती. Geetha Govindam सिनेमातील दोघांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. सिनेमाताल शेवटचा सीन दोघांच्या लग्नावर चित्रीत करण्यात आला आहे. पण तेव्हा लग्नाचा सीन शूट करताना अभिनेत्याला विचित्र वाटत होतं.

विजय म्हणालेला, ‘फक्त पेली मंडपात बसणं ठिक होतं. पण मला मंगळसुत्राच्या तीन गाठी बांधाव्या लागल्या होत्या. तेव्हा मी प्रचंड घाबरलेलो होतो… मला माहिती होतं, सिनेमाचं शुटिंग सुरु आहे. रश्मिका पाट्टी साडीमध्ये बसली होती आणि मी पाट्टू पंचा घातलेला होता… सर्वकाही मला वास्तव वाटत होतं… रश्मिका मला म्हणाली, तीन गाठ बांध… मी विचार करत होतो… हे काय सुरु आहे…? मी अभिनेत्रीला सांगत होतो मला हे सर्व खूप विचित्र वाटत आहे. हे रश्मिकाचं तिसरं ऑनस्क्रिन लग्न होतं आणि तिला कोणतात त्रास होत नव्हता…’ असं देखील अभिनेता म्हणालेला.

लग्नानंतर विजय याने पत्नी रश्मिका हिच्यासाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. ‘एके दिवशी मला तिची आठवण आली. अशी आठवण की मझा दिवस आणखी उत्तम असू शकला असता… जर ती माझ्यासोबत असती. माझ्या पदार्थांना आणखी चव आली असती, जर ती माझ्यासोबत असती. माझं वर्कआऊट आणखी उत्तम झालं असतं, जर ती माझ्यासोबत असती. जसं की मला फक्त आणि फक्त तिची गरज आहे… म्हणून, मी माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणीला माझी पत्नी केलं आहे…’ असं अभिनेता कॅप्शनमध्ये म्हणाला आहे.

रश्मिका हिने देखील भावूक पोस्ट शेअर केली आहे. ‘आता भेट करून देते माझ्या पतीसोबत… श्री विजय देवरकोंडा…! अशी व्यक्ती ज्याने मला खरं प्रेम करणं शिकवलं आहे… असा व्यक्ती ज्याने मला शांतीचा अनुभव करुन दिला आहे… असा व्यक्ती ज्याने मला मोठे स्वप्न पाहण्यासाठी सांगितलं आहे… ज्यामला मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितलं आहे…’ असं रश्मिका म्हणाली आहे. लग्नानंतर रश्मिका आणि विजय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

Follow Us