Kashmira Shah: मसाज करायला गेली अन अभिनेत्री काश्मीरा शाह सोबत झाले असे काही, कि…; video viral
कश्मीराला तिच्या बाईकडून मसाज घेताना दिसत आहे. जे पाहताक्षणी छेडछाडीत बदलते, त्यानंतर कश्मीरा जमिनीवर लोळते आणि मदतीची याचना करताना दिसतेय. परंतु, तिची मोलकरीण तिचे पाय ओढत तिला दूर खेचताना दिसून येते.

बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्ड लूकसाठी अभिनेत्री कश्मिरा शाह (Kashmira Shah)प्रसिद्ध आहे. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळख असलेली कश्मिरा शाह आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कश्मिराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर(Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती ओरडताना दिसून येतेय तसेच मदतीची याचना करताना दिसून आली आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कश्मीरा मसाजसाठी (massage) गेली होती, मात्र मसाजच्या नावाखाली तिच्यासोबत काही वेगळेच घडले आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या काश्मिराने तिला आलेल्या अनुभवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तर झालं असं कि…
अभिनेत्री काश्मीरा शाह सोशलमीडियावर सक्रिय असलेली दिसून येते.अनेकदा तिचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने शेअर केलेल्या व्हिडिओत मसाजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कश्मीराला तिच्या बाईकडून मसाज घेताना दिसत आहे. जे पाहताक्षणी छेडछाडीत बदलते, त्यानंतर कश्मीरा जमिनीवर लोळते आणि मदतीची याचना करताना दिसतेय. परंतु, तिची मोलकरीण तिचे पाय ओढत तिला दूर खेचताना दिसून येते.
तुला टॉर्चर करण्यासाठी पैसे दिले
व्हिडिओमध्ये असे दिसून येतेय सुरुवातीला कश्मीरा खुर्चीवर बसून आरामदायी मसाज करताना दिसत आहे. सुरुवातीला तिला मसाजचा आनंद मिळतो, पण तिचा डावा हात आणि पाय येताच कश्मीरा पळू लागते. कारण मसाजमुळे आराम मिळण्याऐवजी तिला वेदना होऊ लागते. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीला कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला मसाजचा तिरस्कार आहे. ‘कश्मीरा’ ओरडतानाचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. काश्मिराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे . कश्मिरा शाहच्या या मसाज व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या यामध्ये सर्वात मजेशीर कमेंट तिचा पार्टनर कृष्णा अभिषेकने केली आहे. कॉमेडियन म्हणाला, ‘मी तुला टॉर्चर करण्यासाठी पैसे दिले होते.’