अंगडिया मार्फत बांग्लादेशातून सोन्याची तस्करी, मुंबई डीआरआयने जप्त केले ६.६१ किलो सोने
मुंबईतील महसुल गुप्तचर संचालनालयाने ( DRI ) ही धाडसी कारवाई केली आहे. या प्रकरणात सोन्याचे बार अंगडिया मार्फत बांग्लादेशातून मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादला नेले जात असल्याचे उघडकीस आली आहे.

भारत आणि बांग्लादेश सीमेवर चोरट्या मार्गाने सोन्याची तस्करी करुन हे सोने कुरियर मार्फत कर चुकवून मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद येथे विक्रीसाठी आणणारे मोठे रॅकेट मुंबई डीआरआयने नष्ट केले आहे. या प्रकरणात कोणत्याही कागदपत्रांशिवाय, गुवाहाटी आणि कोलकाता येथून कुरिअरद्वारे तस्करीचे सोने मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद येथील प्राप्तकर्त्यांपर्यंत देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी पोहोचवले जात होते असे उघडकीस आले आहे. यावेळी अंदाजे १०.३६ कोटी रुपयांचा ६.६१ किलो विदेशी सोन्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
डी.आर.आय. मुंबईने मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने ऑपरेशन बॉर्डर बुलियन बस्ट अंतर्गत ४७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा सोने तस्करीचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. जवळपास ३१८ किलोहून अधिक सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश यावेळी करण्यात आला आहे. अंगडियाच्या मार्फत आलेल्या मालाच्या आत लपवलेल्या मालाच्या बार स्वरूपातील ६.६१ किलो विदेशी सोन्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या सोन्याचे मूल्य अंदाजे १०.३६ कोटी रुपये आहे.
या टोळीशी संबंधित एकूण ११ जणांना अटक करण्यात आली असून अटक आरोपीत एका सूत्रधाराचाही समावेश आहे.पश्चिम बंगाल आणि आसाममधील भारत-बांगलादेश सीमेवरून परदेशी बनावटीच्या सोन्याची नियमितपणे तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली होती. हे सोने एका कुरिअर कंपनीमार्फत ते देशाच्या विविध भागांमध्ये पुढील वितरणासाठी नेले जात असल्याची विशिष्ट गुप्त माहिती मुंबई डीआरआयला मिळाली होती.
याबाबत समोर आलेल्या माहितीनूसार यात कोणत्याही कागदपत्रांशिवाय, गुवाहाटी आणि कोलकाता येथून कुरिअरद्वारे तस्करीचे सोने मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद येथील प्राप्तकर्त्यांपर्यंत देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी पोहोचवले जात होते अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
