श्रीदेवी यांच्या कोट्यवधीच्या संपत्तीवर कोणाचा हक्क ? सुप्रीम कोर्टाची जान्हवी – खुशी – बोनी कपूर यांना नोटिस

सर्वोच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या चेन्नई येथील मालमत्तेवरील वादात 'जैसे थे' स्थिती ठेवण्याचे आदेश देत बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांना नोटीस बजावली आहे.

श्रीदेवी यांच्या कोट्यवधीच्या संपत्तीवर कोणाचा हक्क ? सुप्रीम कोर्टाची जान्हवी - खुशी - बोनी कपूर यांना नोटिस
Janhvi, Khushi and Boney Kapoor
| Updated on: Sep 16, 2026 | 8:04 PM

बॉलीवुड प्रसिद्ध आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक चेन्नईतील त्यांच्या एका मालमत्ते संदर्भात कायदेशीर वाद सुरु होता. आता हे संपूर्ण प्रकरण सर्वाच्च न्यायालयात पोहचले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट निर्माता बोनी कपूर आणि त्यांच्या दोन कन्या जान्हवी आणि खुशी कपूर यांना नोटीस पाठवली आहे.

याच सोबत कोर्टाने स्पष्ट आदेश दिला आहे की सध्या संपत्तीची जी सद्यस्थिती आहे , त्यात कोणताही बदल केला जाऊ नये म्हणजे यथास्थिती ( Status Quo) कायम ठेवावी असे न्यायालयाने म्हटले आहे.

प्रॉपर्टीवर कोर्टाचे कठोर निर्देश

सुप्रीम कोर्टात न्या.के.व्ही विश्वनाथन आणि न्या. अरुण पिल्लई यांच्या खंडपीठीने या प्रकरणाची सुनावणी केली. कोर्टाने चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोड (ECR) भागात असलेली श्रीदेवी यांच्या अचल संपत्ती संदर्भात दोन्ही पक्षांना निर्देश दिले आहेत. खास बाब म्हणजे कोर्टाने दोन्ही पक्षांना आपआपसात चर्चा करुन म्हणजे मध्यस्थता करुन देखील हा तंटा सोडवण्याचा एक सल्ला दिला आहे.

मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान

या अगोदर हे प्रकरण मद्रास हायकोर्टात होते. तेथील मद्रास हायकोर्टाने एम.सी.शिवगामी आणि एम.सी. नटराजन यांचे दावे फेटाळून लावत निकाल कपूर कुटुंबाच्या बाजूने दिला होता. हायकोर्टाच्या या निकालाला आता सर्वोच्च न्यायालयात एम.सी.शिवगामी आणि एम.सी. नटराजन यांनी आव्हान दिले आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता या प्रकरणात कपूर कुटुंबाला नोटीस पाठविली आहे.

18 डिसेंबर रोजी पुढची सुनावणी

सध्या कपूर कुटुंब आणि दुसरा पक्ष दोन्हींना पुढच्या तारखेची वाट पाहावी लागणार आहे. सुप्री कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबरची तारखेला ठेवली आहे. तोपर्यंत चेन्नईच्या या प्रॉपर्टी संदर्भात जैसे थी स्थिती कायम राहून तिला हात लावता येणार नाही.

आता सर्वाची नजर दोन्ही पक्ष कोर्टाचा सल्ला मानून आपसात हा वाद परस्पर सहमतीने सोडवतात की १८ डिसेंबर रोजी कोर्टात नवीन तारख पाहायला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us