या अभिनेत्रीवर क्रिकेटर्सही फिदा, वीरेंद्र सेहवागने गुपित केलं उघड; कोण आहे ती?

'राइज अँड फॉल 2' या शोमध्ये ही अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका चर्चेत आहे. अनेक क्रिकेटपटू तिला मेसेज करत असल्याचा खुलासा तिने या शोमध्ये केला. तेव्हा वीरेंद्र सेहवागनेही तिचा फोन पाहण्याची गंमतीशीर मागणी केली.

या अभिनेत्रीवर क्रिकेटर्सही फिदा, वीरेंद्र सेहवागने गुपित केलं उघड; कोण आहे ती?
सारा गुरपाल
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 29, 2026 | 3:05 PM

पंजाबी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री आणि गायिका सारा गुरपाल सध्या ‘राइज अँड फॉल 2’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आली आहे. शोच्या प्रीमिअरदरम्यान तिने केलेल्या एका खुलाशानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. अनेक क्रिकेटपटू आपल्याला मेसेज करत असल्याचं साराने सांगितलं. यानंतर शोचा होस्ट वीरेंद्र सेहवाग याने तिचा फोन पाहण्याची गंमतीशीर मागणी केली आणि फोनमधील चॅट पाहून त्याचीही प्रतिक्रिया चर्चेत आली.

कोण आहे सारा गुरपाल?

सारा गुरपाल ही पंजाबी अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते. तिचा जन्म हरियाणात झाला असून तिने चंदीगडमध्ये फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. 2012 मध्ये तिने ‘मिस चंदीगड’चा किताब जिंकला होता. त्यानंतर 2013 मध्ये रणजीत बावाच्या ‘जीन’ या गाण्यातून तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे साराने पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं. ‘गुरमुख – द आईविटनेस’, ‘शावा नी गिरधारी लाल’, ‘यार मेरा टिटलियां वर्गा’ आणि ‘घोडा ढाई कदम’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये ती झळकली आहे. अभिनयासोबतच तिने गायनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘स्लो मोशन’, ‘लगदी अट’ आणि ‘की मैं कल्ली आ’ यांसारख्या गाण्यांमध्ये तिने आवाज दिला आहे.

Loading...

साराने 2020 मध्ये ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या शोमुळे पंजाबी इंडस्ट्रीबाहेरही तिची मोठी ओळख निर्माण झाली. मात्र, तिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास अपेक्षेइतका लांबला नाही. त्यानंतर काही काळ ती रिअॅलिटी टीव्हीपासून दूर राहिली.

साराने अलीकडील मुलाखतीत ‘बिग बॉस’मधील अनुभवाबद्दल बोलताना त्या काळात तिला डोळ्यांचा गंभीर संसर्ग झाल्याचं सांगितलं. आता तब्बल पाच वर्षांनंतर सारा पुन्हा रिअॅलिटी टीव्हीवर परतली आहे. ‘राइज अँड फॉल 2’मध्ये सहभागी होताना यावेळी आपल्याला स्वतःला वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची संधी मिळावी, अशी तिची भूमिका आहे. शोमध्ये तिच्यासोबत अनेक चर्चित चेहरे सहभागी झाले आहेत.

क्रिकेटपटूंच्या मेसेजबाबत केलेल्या साराच्या वक्तव्यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. वीरेंद्र सेहवाग यानेही तिच्या फोनमधील चॅट पाहून केलेली गंमतीशीर टिप्पणी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. आता ‘राइज अँड फॉल 2’मधील तिचा पुढचा प्रवास कसा असतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us