Bigg Boss : बिग बॉसचं घर पण पडद्यामागे घडतं तरी काय! बाथरुममध्ये शारीरिक संबंध, सिगरेट, दारु अन्…, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Bigg Boss : 'बिग बॉस'च्या घराबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांना उपस्थित होत असतात. ज्याची उत्तरं स्पर्धक घरातून बाहेर आल्यानंतर देत असतात. पण आता एका प्रसिद्ध अभिनेत्री बिग बॉसच्या घरात पडद्यामागे काय घडतं याचा मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

Bigg Boss : बिग बॉसचं घर पण पडद्यामागे घडतं तरी काय! बाथरुममध्ये शारीरिक संबंध, सिगरेट, दारु अन्..., अभिनेत्रीचा मोठा खुलासा
बिग बॉस
| Updated on: Oct 01, 2026 | 12:17 PM

Bigg Boss : अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा 20 वा सिझन सध्या सुरु आहे. शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. घरात आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. एवढंच नाही तर, 24 तास कॅमेऱ्याची नजर स्पर्धकांवर असते. आता या शोबद्दल काही महत्त्वाचे खुलासे समोर आले आहे… जे ‘बिग बॉस ओटीटी’ पहिल्या सिझनची विजेती दिव्या अग्रवाल हिने केले आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिव्या हिने, बिग बॉसच्या घरात मिळणारी सिगरेट, दारु आणि स्पर्धकांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केल आहे..

दिव्या त्या प्रश्नांची देखील उत्तरं दिली, जी शो संपल्यानंतर प्रेक्षकांना विचारली जातात. पॉडकास्टमध्ये दिव्या हिने घरातील जेवणाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. बिग बॉसच्या घरात कॉफी आणि केचप देखील एक लग्जरी गोष्टीपेक्षा कमी नाही. ते मिळवण्यासाठी देखील अनेक प्रयत्न करावे लागतात. पण घरातील रेशनवर अनेक बंधनं आहेत, पण सिगरेट मिळवण्यासाठी कोणत्याच अडचणी येत नााहीत.

Loading...

बिग बॉसच्या घरात मिळते दारु?

शो मधून बाहेर आल्यावर प्रेक्षकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा असतो की, ‘विकेंड का वार’ किंवा पार्ट्यांमध्ये स्पर्धकांना दारू दिली जाते का? दिव्याने याचा पर्दाफाश केला आणि स्पष्ट केलं की, लोकांना वाटतं की आतमध्ये दारू मिळत असेल, पण वस्तुस्थिती ही आहे की बिग बॉसच्या घरामध्ये कोणालाही दारू किंवा अल्कोहोल दिलं जात नाही.

बाथरुममध्ये खूप काही होतं…

पॉडकास्टदरम्यान जेव्हा घराच्या आतील प्रायव्हसी आणि स्पर्धकांमधील नात्यांबद्दल चर्चा झाली, तेव्हा दिव्याने अत्यंत धक्कादायक गोष्ट सांगितली. तिला विचारलं गेलं की, लोक हे सुद्धा विचारतात का की आतमध्ये सेक्स होतो का? यावर दिव्याने हसत हसत होकार दिला आणि मोठा इशारा करत म्हटलं की, कॅमेऱ्यासमोर जरी काही दिसत नसले, तरी आतमध्ये खूप काही होतं. पुढे शार्दुल पंडित म्हणाला, ‘होतं तर खूप काही, पण बाथरूमच्या आत’. याशिवाय दिव्याने हसत हसत हेसुद्धा सांगितलं की, लोक तिला इतके विचित्र प्रश्न विचारतात की, एकदा तर एकाने तिला असेही विचारलं होतं की, घराच्या आतमध्ये वॅक्सिंग करणाऱ्या मुली येतात का? तर असं काहीही होत नाही. असं देखील दिव्या म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us