Dada Kondke : शेवटच्या क्षणी कशी होती दादा कोंडके यांची परिस्थिती? प्रसिद्ध लेखिका म्हणतात, ‘2 तास त्यांच्या प्रेताजवळच…’

Dada Kondke : दादा कोंडके यांच्या निधानाचा अंगावर काटा आणणारा प्रसंग, शेवटच्या क्षणी कशी होती परिस्थिती? अनेक वर्षांनंतर प्रसिद्ध लेखिकेचा मोठा खुलासा, म्हणाल्या, ॲम्ब्युलन्स मिळेना, दोन तास त्यांच्या प्रेताजवळच...

Dada Kondke : शेवटच्या क्षणी कशी होती दादा कोंडके यांची परिस्थिती? प्रसिद्ध लेखिका म्हणतात, 2 तास त्यांच्या प्रेताजवळच...
Dada Kondake
| Updated on: Aug 08, 2026 | 9:03 AM

Dada Kondke : ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘अंधळा मारतो डोळा’, ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’ अशा अनेक एकापेक्षा सिनेमांच्या माध्यमातून सुप्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि त्यांनी चाहत्यांच्यां मनावर राज्य केलं. दादा कोंडके यांच्या सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांना पोट धरुन हसवलं, पण शेवटच्या क्षणी त्यांची अवस्था अंगावर काटे आणणारी होती. दरम्यान, एका मुलाखतीत प्रसिद्ध लेखिका अनिता पाध्ये यांनी दादा कोंडके यांच्या मृत्यूचा प्रसंग सांगितला आहे. सांगायचं झालं तर 14 मार्च 1998 मध्ये दादा कोंडके यांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबिय नव्हते, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चार व्यक्ती होत्या…

मुलाखतीत दादांच्या निधनाचा दिवस आठवत अनिता पाध्ये म्हणाल्या, ‘दादा कोंडके यांची प्रकृती अचानक एका रात्री खालावली. त्यामुळे त्यांना तात्काळ सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं… तेव्हा त्यांच्यासोबत काम करणारी लोकं होती… रात्राा पाऊणे तीन वाजता दादा कोंडके यांचे मॅनेजर जीतू भाई यांचा मला फोन आला, त्यांनी सांगितलं, ‘दादांची प्रकृती बिघडली आहे.. आम्ही सुश्रुषा रुग्णालयात आहोत, तुम्हाला यायला जमेल का… मी येते म्हणून सांगितलं..’

‘मी माझ्या भावाला सांगितलं की, तू दादांच्या नातेवाईकांनी फोन कर… दादांना ॲम्ब्युलन्सने घेऊन जायचं होतं. त्या काळात जास्त ॲम्ब्युलन्स नव्हत्या. हॉस्पिटलमध्ये दारातच ॲम्ब्युलन्स होती. पण त्याासाठी फॉर्म भरावा लागणार होता. शिवसेनेची ॲम्ब्युलन्स होती पण ती मिळाली नाही. त्यानंतर मी विजय कोंडके यांना फोन केलं. शेवटच्या काळात दादा आणि विजय यांचे चांगले संबंध नव्हते… असं असताना मी त्यांना फोन केला. दादांच्या जवळच्या दोन मित्रांना कळवलं… त्यावेळचे कामगार मंत्री साबीर शेख यांना फोन केला पण ते बाहेर होते. दोन तास हॉस्पिटलमध्ये दादांच्या प्रेताजवळ मी एकटीच होते’

अनीता पाध्ये पुढे म्हणाल्या, ॲम्ब्युलन्स मिळतच नव्हती. अखेर मी आणि दादांचे दोन मित्र दादांना त्यांच्या कॉन्टेसा गाडीतून त्यांचं प्रेत घेऊन आले… त्यांच्या घरी त्यांचं प्रेत ठेवलं होतं. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दादांचे नातेवाईक, राजकारणी नेते आलेले. बाळासाहेब ठाकरे देखील आलेले, ते दादांच्या प्रेताजवळ बसून त्यांच्या कपाळावरून हात फिरवत होते… असं देखील अनीता यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us