दिल्लीतील TV9 Festival of India मध्ये महादुर्गा आरती, डांडिया नाईटचा जल्लोष; कलाकारांच्या सादरीकरणाने वाढवली रंगत

दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे TV9 Festival of India 2026 या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महापुजा, होम हवन तसेच आरतीदेखील करण्यात आली. दिल्लीतल तसेच देशभरातील अनेक नागरिक टीव्ही9 भारतवर्ष कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. यावेळी पुजेहस रास दांडियाचेदेखील आयोजन करण्यात आले होते.

दिल्लीतील TV9 Festival of India मध्ये महादुर्गा आरती, डांडिया नाईटचा जल्लोष; कलाकारांच्या सादरीकरणाने वाढवली रंगत
durga puja tv9 marathi
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 10:02 AM

दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या TV9 Festival of India 2026 या महोत्सवाच्या आठव्या दिवशी भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान आयोजित या महोत्सवात महाअष्टमीच्या निमित्ताने भाविकांनी देवी दुर्गेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. एका बाजूला पूजा आणि आरतीमुळे वातावरण भक्तिमय झाले, तर दुसरीकडे डांडियाच्या तालावर दिल्लीकरांनी ठेका धरला.

महाअष्टमीच्या दिवशी सकाळी सुमारे 9 वाजता अष्टमीची विशेष पूजा आणि पुष्पांजलीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी देवीला भोग अर्पण करण्यात आला आणि चंडीपाठाचे आयोजन करण्यात आले. पूजा पूर्ण झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी झालेल्या विशेष महाआरतीने उत्सवाची शोभा वाढवली. ढाकचा नाद आणि धुनुची नृत्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Loading...

या महोत्सवात काँग्रेस नेते राजीव शुक्ला आणि भाजप नेते सतीश उपाध्याय यांनीही उपस्थिती लावली. दोन्ही नेत्यांनी देवी दुर्गेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. धार्मिक कार्यक्रमांसोबतच संगीत आणि सांस्कृतिक सादरीकरणांचाही प्रेक्षकांनी आनंद घेतला.

संगीत आणि डांडियाने वाढवली उत्सवाची रंगत

संध्याकाळच्या सत्रात बीपी सिंह यांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमींचे लक्ष वेधले. त्यानंतर श्रेयस धर्माधिकारी यांनी आपल्या आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पुढे DJ शिवल यांच्या संगीताच्या तालावर डांडिया रास रंगला. कुटुंबीय आणि मित्रांसोबत आलेल्या नागरिकांनी नृत्य आणि संगीताचा मनमुराद आनंद घेतला.

मुलांच्या कलागुणांनाही मिळाले व्यासपीठ

महोत्सवातील फेस्टिव्ह क्राफ्ट्स अँड क्रिएटिव्ह कॉर्नरअंतर्गत ‘टॅलेंट का तडका’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात सांस्कृतिक नृत्य, संगीत, मिमिक्री, स्किट आणि नाटक अशा विविध कलांचे सादरीकरण झाले. तसेच ‘किड्स डे आउट’ उपक्रमांतर्गत संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत चित्रकला, फॅन्सी ड्रेस, नृत्य आणि संगीत स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि प्रेक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिले.

TV9 Festival of India हा धार्मिक विधींसोबतच संगीत, नृत्य, हस्तकला आणि खरेदीचा आनंद देणारा महोत्सव ठरत आहे. भारतीय संस्कृतीचे विविध रंग अनुभवण्यासाठी नागरिकांना येथे खास संधी मिळत आहे.

हा महोत्सव 20 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये सुरू राहणार आहे. महोत्सवाची तिकिटे BookMyShow आणि District by Zomato या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us