रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवायचंय?; मग या 3 गोष्टी रिकाम्यापोटी खा

| Updated on: Aug 01, 2021 | 9:19 AM

आजकाल अनियमित जीवन शैली आणि खाण्यापिण्यात कोणतंही ताळतंत्र नसल्याने अनेक आजार होत असतात. त्यातील एक आजार म्हणजे मधूमेह हा होय. (eat these things empty stomach to control blood sugar level)

रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवायचंय?; मग या 3 गोष्टी रिकाम्यापोटी खा
blood sugar
Follow us on

नवी दिल्ली: आजकाल अनियमित जीवन शैली आणि खाण्यापिण्यात कोणतंही ताळतंत्र नसल्याने अनेक आजार होत असतात. त्यातील एक आजार म्हणजे मधूमेह हा होय. हार्मोन्स असंतुलित होणं, धुम्रपान, शारीरिक चालली कमी होणे आणि लठ्ठपणामुळे हा आजार होतो. या आजारात पॅन्क्रियाज इन्सूलिनची निर्मिती बंद होते. इन्सूलिन हा एक प्रकारचा हार्मोनच आहे. रक्तातील ग्लूकोजमध्ये मिसळून हे इन्सूलिन शरीराला ऊर्जा देतं. मधूमेह रुग्णांमध्ये रक्तातील साखरेवरची लेव्हल अनियंत्रितरित्या कमी जास्त होत जाते. (eat these things empty stomach to control blood sugar level)

तज्ज्ञांच्या मते शरीरात ब्लड शुगर मोठ्या प्रमाणावर वाढल्यास हार्ट अटॅक, किडनी फेल होणे, ब्रेन स्ट्रोक आणि मल्टिपल ऑर्गन फेल्यूअरचा धोका वाढतो. मात्र, रोजच्या जीवनशैलीत थोडा बदल केला आणि खाण्यापिण्याची पथ्य पाळल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येतं. ज्या रुग्णांमध्ये ब्लड शुगर अत्याधिक प्रमाणात आहे, त्यांनी रिकाम्यापोटी काही पदार्थांचं सेवन केल्यास त्यांच्या रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढण्यास मदत होते.

या पदार्थांचं रिकाम्यापोटी सेवन करा

हिरवी मिरची: हिरव्या मिरच्यांमध्ये कॅप्सेसिनचं प्रमाण चांगलं असतं. त्याच्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे रोज 30 ग्राम हिरवी मिरची रिकाम्यापोटी खावी. बराच फरक पडतो.

मेथी: मेथीमध्ये व्हिटामिन सी, ए, बी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असतं. त्यात फॉस्फेरिक अॅसिड, प्रोटीन आणि फायबर असतं. त्याचा मधूमेही रुग्णांना फायदाच होतो. त्यासाठी रात्री एका ग्लासात एक चमचा मेथीचे दाणे टाकून भिजत ठेवयाचे. सकाळी हे पाणी प्यायचं.

आद्रक: रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आद्रक खूप महत्त्वाची आहे. आद्रकमधील तत्त्वांमुळे इन्सुलिन वाढण्यास मदत होते. रुग्णांनी रिकाम्यापोटी आद्रकाचं पाणी किंवा आद्रक टाकलेली चहा घ्यावी. या शिवाय आद्रकची पावडर किंवा कच्ची आद्रक खाणंही चांगलं असतं. (eat these things empty stomach to control blood sugar level)

 

संबंधित बातम्या:

Health Tips | शुद्ध तूप आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या याबद्दल अधिक…

वजन कमी करायचे आहे? मग जेवल्यानंतर 45 मिनिटे पाणी पिणे टाळाच!

चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ हेअर मास्क केसांना लावा आणि समस्या दूर करा!

(eat these things empty stomach to control blood sugar level)